भारतीय क्रिकेटपटूनं केली रिया चक्रवर्तीची 'पोल खोल'?; पोस्ट केला सुशांत सिंगचा जुना Video

रिया चक्रवर्तीने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 08:39 PM2020-08-27T20:39:34+5:302020-08-27T20:47:49+5:30

whatsapp join usJoin us
Here is the proof of Sushant Singh Rajput enjoying in disneyland Paris; Indian cricketer Manoj Tiwari post video   | भारतीय क्रिकेटपटूनं केली रिया चक्रवर्तीची 'पोल खोल'?; पोस्ट केला सुशांत सिंगचा जुना Video

भारतीय क्रिकेटपटूनं केली रिया चक्रवर्तीची 'पोल खोल'?; पोस्ट केला सुशांत सिंगचा जुना Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता दोन महिने उलटून गेले आहेत. अद्याप त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. दरम्यान रिया चक्रवर्तीने एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली आहेत. त्यावेळी तिने युरोप ट्रिपदरम्यान पॅरिसमधील खोलीतून सुशांत तीन दिवस बाहेरही आला नव्हता, असा दावा केला. त्यावरून भारतीय क्रिकेटपटूनं तिचा 'पोलखोल' करणारा व्हिडीओच पोस्ट केला. 

सुशांत सिंग मृत्यूचे कनेक्शन गोव्यातील रेव्ह पार्टीशीही?, गौरव आर्या रडारवर

रियाने आजतकला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, युरोप ट्रिपला जाताना सुशांतने मला आणि सर्वांना सांगितले की त्याला फ्लाइटमध्ये बसल्यावर क्लोस्ट्रोफोबियाचा त्रास होतो. त्यासाठी तो औषध घेतो. ज्याचे नाव आहे मोडाफिनी आणि त्याच्याजवळ हे औषध नेहमी असायचे. त्याने फ्लाइटमध्ये जाण्याआधी हे औषध स्वतःहून घेतले. त्याला त्यासाठी कोणत्याच प्रीस्क्रिप्शनची घ्यावे नाही लागले कारण त्याच्याकडे ते औषध आधीपासूनच होते.

ती पुढे म्हणाली की, ''सर्वात आधी आम्ही पॅरिसला उतरलो. पहिले तीन दिवस सुशांत त्याच्या खोलीतून बाहेर नाही पडला. मला वाटले की काय झालं. तो खूप एक्साइटेड होता की आम्ही पॅरिसला जाणार तिथे त्याला कोणी ओळखणार नाही. कारण तिथे मला तो खरा अंदाज दाखवू शकेल. त्याचा मजेशीर स्वभाव होता. मी रस्त्यावर चालू शकतो. हेदेखील करू शकतो जे मला भारतात करता येत नव्हते. मात्र तिकडे गेल्यावर तो खोलीतून बाहेरच नाही पडला.''

तिच्या या दाव्यानंतर भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारी यानं सुशांतचा एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यानं रियाचा दावा खोडून काढला आणि सुशांत पॅरिस येथील डिस्नीलँड येथे गेल्याचा पुरावा दिला.''
पाहा व्हिडीओ... 
 


 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची अन्य संघांनी घेतली धास्ती; बिग बॅश लीग गाजवणारा गोलंदाज ताफ्यात दाखल   

IPL 2020 : मुंबई इंडियन्स अन् KKR ला झटका; खेळाडूंना 7 नव्हे तर 14 दिवसांसाठी व्हावे लागले क्वारंटाईन

'विरुष्का'नं दिली गोड बातमी अन् इथे नेटिझन्सनी लगावला मीम्सचा मास्टर स्ट्रोक!  

IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!

Web Title: Here is the proof of Sushant Singh Rajput enjoying in disneyland Paris; Indian cricketer Manoj Tiwari post video  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.