Join us

हेराथचा बळीषटकार; श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 480 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 290 धावांवर संपुष्टात आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2018 14:43 IST

Open in App
ठळक मुद्देहेराथने 98 धावांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले आणि त्यामुळे श्रीलंकेला सहज विजय मिळवता आला.

कोलंबो : फिरकीपटू रंगना हेराथने मिळवलेल्या बळीषटकाराच्या बळावर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर 199 धावांनी दमदार विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात टाकली आहे.

श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 480 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 290 धावांवर संपुष्टात आला. हेराथने यावेळी श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. हेराथने 98 धावांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले आणि त्यामुळे श्रीलंकेला सहज विजय मिळवता आला.

टॅग्स :क्रिकेटश्रीलंकाद. आफ्रिका