काव्या मारनच्या संघातील फलंदाजाचे विक्रमी शतक; मुंबई इंडियन्सच्या संघातील गोलंदाजांना बेक्कार धुतले

इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघातील स्फोटक फलंदाजाने मंगळवारी मेजर लीग क्रिकेटमध्ये विक्रमी शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:31 AM2023-07-26T11:31:58+5:302023-07-26T11:34:05+5:30

whatsapp join usJoin us
HEINRICH KLAASEN 110* off just 44 balls; THE FIRST EVER CENTURION OF Major League Cricket | काव्या मारनच्या संघातील फलंदाजाचे विक्रमी शतक; मुंबई इंडियन्सच्या संघातील गोलंदाजांना बेक्कार धुतले

काव्या मारनच्या संघातील फलंदाजाचे विक्रमी शतक; मुंबई इंडियन्सच्या संघातील गोलंदाजांना बेक्कार धुतले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगमधील सनरायझर्स हैदराबाद संघातील स्फोटक फलंदाज हेनरिच क्लासेन ( Heinrich Klaasen ) याने मेजर लीग क्रिकेटमध्ये ( Major League Cricket) मंगळवारी विक्रमाला गवसणी घातली. Major League Cricket मध्ये शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२०, इंडियन प्रीमिअर लीग आणि आता MLC मध्ये क्लासेनने शतकी खेळी केली. MLC मध्ये तो Seattle Orcas संघाकडून खेळतोय आणि त्याने मुंबई इंडियन्स न्यू यॉर्कच्या गोलंदाजांची धुलाई केली. 


प्रथम फलंदाजी करणाऱ्या Mi New York संघाने २० षटकांत ८ बाद १९४ धावा केल्या. निकोलस पूरनने ३४ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने ६८ धावा कुटल्या. कर्णधार किरॉन पोलार्डने १८ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. टीम डेव्हिड ( १८) व डेव्हिड वीसे ( १९) यांनी शेवटच्या षटकांत योगदान दिले. ट्रेंट बोल्टने ६ चेंडूंत नाबाद २० धावांची खेळी केली. इमाद वासीम व हरमीत सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.


१९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नौमान अन्वरने ३० चेंडूंत ५१ धावा चोपल्या, परंतु क्विंटन डी कॉक ( ९) व शेहान जयसुर्या ( ०) हे स्वस्तात बाद झाले. ट्रेंट बोल्टने  Seattle Orcas च्या फलंदाजांना तंबूत पाठवण्याचे सत्र सुरू ठेवले. कर्णधार दासून शनाकाही १० धावांवर बाद झाला. अशा परिस्थितीत क्लासेन एकटा भिडला अन् त्याने ४४ चेंडूंत ९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने नाबाद ११० धावा कुटल्या. त्याने १९.२ षटकांत संघाला विजय मिळवून दिल्या. Seattle Orcas च्या ८ बाद १९५ धावा झाल्या. बोल्टने ४ विकेट्स घेतल्या, तर राशीद खानने २ बळी टिपले. 

Web Title: HEINRICH KLAASEN 110* off just 44 balls; THE FIRST EVER CENTURION OF Major League Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.