ठळक मुद्देभारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरसाठी बऱ्याचदा चाहते मैदानात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक चाहता सामना सुरु असताना मैदानात घुसला होता. हा चाहता चक्क धोनीच्या पाया पडला होता.एका सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीचा चाहता मैदानात आला होता. यावेळी या चाहत्याला कोहलीबरोबर सेल्फी काढायचा होता.
नवी दिल्ली : कोणतीही गोष्ट चाहत्यांशिवाय अर्धवट असते. त्यामुळे रसिकांना माय-बाप म्हटले जाते. अगदी क्रिकेटसारखा खेळही तसाच. चाहत्यांशिवाय क्रिकेटही अधुरेच. पण काही चाहते असे असतात की त्याने खेळालाही बट्टा लागतो. अशीच एक गोष्ट इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान घडली.
भारतीय क्रिकेटमध्येही अशा काही घडना घडल्या आहेत. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरसाठी बऱ्याचदा चाहते मैदानात घुसल्याच्या घटना घडल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा एक चाहता सामना सुरु असताना मैदानात घुसला होता. हा चाहता चक्क धोनीच्या पाया पडला होता. एका सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीचा चाहता मैदानात आला होता. यावेळी या चाहत्याला कोहलीबरोबर सेल्फी काढायचा होता.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातीन सामन्यादरम्यान खेळाडू खेळपट्टीजवळ पाणी पित होते. त्यावेळी हा चाहता अर्धनग्न अवस्थेत मैदानात घुसला. तो धावत खेळाडूंकडे आला. खेळाडूंजवळ खेळपट्टीवर आल्यावर मात्र त्याने आपले उर्वरीत कपडे काढले आणि त्यानंतर धावत सुटला. अखेर तो जेव्हा सीमारेषेजवळ आला तेव्हा त्याला पकडण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले.
हा पाहा व्हिडीओ