Join us  

शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागल्याने वडील नाराज; म्हणाले, हे योग्य नाही...

शुबमन गिलने १५० चेंडूत १२  चौकार आणि पाच षटकारांसह ११० धावांची अप्रतिम खेळी केली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2024 4:16 PM

Open in App

India vs England 5th Test Live update Day 2 :  धरमशाला येथे सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात शुबमन गिलने ( Shubman Gill) शतक झळकावले. गिलने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना मालिकेतील दुसरे शतक झळकावले. पण, त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागत असल्याने शुबमनचे वडील लखविंदर सिंग नाराज झाले आहेत. ११० धावांची खेळी करणाऱ्या आपल्या मुलाने भारतासाठी ओपनिंगला खेळायला हवे, असे लखविंदर यांचे मत आहे.

दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेल्या शुबमनने कर्णधार रोहित शर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी केली. शर्माने १६२ चेंडूंत १३ चौकार आणि तीन षटकारांसह १०३ धावा केल्या. तर गिलनेही  १५० चेंडूत १२  चौकार आणि पाच षटकारांसह ११० धावांची अप्रतिम खेळी केली. 

लखविंदर सिंग पीटीआयशी बोलताना म्हणाले, माझ्या मते, त्याने डावाची सुरुवात केली पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही ड्रेसिंग रुममध्ये बसून बराच वेळ तुमच्या संधीची वाट पाहत असता, तेव्हा दबाव वाढतो. तिसरा क्रमांक हा डावाच्या सुरुवातीतही नाही किंवा मधल्या फळीतही नाही. त्याचा खेळ चेतेश्वर पुजारासारखा नाही. पुजारा अतिशय बचावात्मक खेळतो. गिलचा खेळ यापेक्षा खूपच वेगळा आहे. मी त्याचे निर्णय घेत नाही कारण तो मोठा झाला आहे आणि त्याला कोणत्या क्रमांकावर खेळायचे आहे हे तो स्वत: ठरवू शकतो.  

धरमशाला कसोटी सामन्यापूर्वी जेव्हा टीम इंडियाचे सर्व खेळाडू ब्रेकवर होते. त्यावेळी गिलने वडिलांसोबत मोहालीच्या मैदानात सराव केला होता. याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, शुबमन गिल त्याच्या १६ वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसांपासून वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंना खेळत आहे.   जेव्हा तुम्ही तुमचा नैसर्गिक खेळ खेळत नाही तेव्हा खूप त्रास होतो.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिल