Join us

'त्याला' दुसरा सचिन तेंडुलकर का म्हणतात...

आतापर्यंत दुसरा सचिन तेंडुलकर पाहण्याचा अट्टाहासही कायम आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 19:11 IST

Open in App
ठळक मुद्देसचिन हा एक महान खेळाडू होता. त्याची जागा कोणत्याही खेळाडूला घेणे शक्य नाही. पण त्याच्यासारखी फलंदाजी करणारा एक युवा फलंदाज नजरेस पडला आणि चाहत्याने त्याची तुलना सचिनशी करायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : कोणत्याही महान व्यक्तीची तुलना होऊच शकत नाही. पण त्याची कारकिर्द संपली की अन्य लोकांमध्ये चाहते त्याला पाहू लागतात. आपला लाडका अभिनेता, अभिनेत्री किंवा खेळाडू आपण त्या क्षेत्रातील व्यक्तींमध्ये पाहतो. ही गोष्ट चुकीची असली तरी ते करताना बरीच जणं दिसतात. त्यामुळे आतापर्यंत दुसरा सचिन तेंडुलकर पाहण्याचा अट्टाहासही कायम आहे.

सचिन हा एक महान खेळाडू होता. त्याची जागा कोणत्याही खेळाडूला घेणे शक्य नाही. पण त्याच्यासारखी फलंदाजी करणारा एक युवा फलंदाज नजरेस पडला आणि चाहत्याने त्याची तुलना सचिनशी करायला सुरुवात केली आहे. तो युवा खेळाडूही सचिनसारखाच थोडा कमी उंचीचा आणि मुंबईकडूनच खेळणारा आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना गुरुवारी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबईकर पृथ्वी शॉ फलंदाजीचा सराव करत होता. त्याचा हा सराव पाहून, हा दुसरा तेंडुलकर असल्याची प्रतिक्रीया काही चाहत्यांनी दिली आहे. आयपीएलमध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळत असताना काही दिग्गज खेळाडूंनीही पृथ्वीची तुलना सचिनशी केली होती.

हा पाहा पृथ्वी शॉ याचा सराव

टॅग्स :सचिन तेंडुलकरपृथ्वी शॉ