Join us

‘त्याने मला १५ व्या मजल्याच्या बाल्कनीत लटकत ठेवले’, चहलनं सांगितला थोडक्यात जीव वाचल्याचा किस्सा!

लेग स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएलच्या  सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघात होता. २०१४ मध्ये चहल आरसीबीकडे आला.  आता  राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे. राजस्थानने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. चहलने आपल्यावर बेतलेला प्रसंग कथन केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 08:23 IST

Open in App

मुंबई : लेग स्पिनर युजवेंद्र चहल आयपीएलच्या  सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघात होता. २०१४ मध्ये चहल आरसीबीकडे आला.  आता  राजस्थान रॉयल्सचा खेळाडू आहे. राजस्थानने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. चहलने आपल्यावर बेतलेला प्रसंग कथन केला.

तो म्हणाला, ‘माझ्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. मी याबाबत कधीही कुणाला सांगितलेले नाही.  मुंबई संघात असताना २०१३ ला आरसीबी विरुद्ध एक सामना होता. त्यानंतर गेट टु गेदर होते. तेव्हा एक खेळाडू खूप नशेत होता. मी त्याचे नाव सांगणार नाही. तो बराच वेळेपासून मला पाहत होता. त्याने मला बोलावले आणि बाल्कनीत लटकविले. मी माझ्या हाताने त्या खेळाडूच्या मानेमागे हात टाकून डोके पकडले. माझा हात सुटला असता तर... तेव्हा मी १५ व्या मजल्यावर होतो. अचानक तेथे अनेक लोक आले आणि त्यांनी परिस्थिती सांभाळली. मी बेशुद्धावस्थेत गेल्याप्रमाणे होतो. त्यांनी मला पाणी पाजले.  मला तेव्हा लक्षात आले  की, आपण कुठेही गेलो तर आपण किती जबाबदारीने वागले पाहिजे. ही अशी घटना होती ज्यात मी अगदी थोडक्यात बचावलो होतो. थोडी चूक झाली असती तर मी १५ व्या मजल्यावरून खाली पडलो असतो.’

टॅग्स :आयपीएल २०२२राजस्थान रॉयल्स
Open in App