Join us  

टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का?, १९९२ च्या आठवणींना उजाळा

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ या रेट्रो जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.

By मोरेश्वर येरम | Published: November 25, 2020 12:29 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळणार १९९२ च्या आठवणींना उजाळाशिखर धवनने ट्विट केला नव्या जर्सीतील फोटोऑस्ट्रेलियाच्या भूमीत कांगारुंना पराभूत करण्यासाठी भारतीय संघ सज्ज

सिडनीभारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाची लढत पाहण्यासाठी सर्व क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. यासोबतच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ नव्या जर्सीसह दिसणार असल्याची चर्चा होती. ही चर्चा खरी ठरलीय. भारतीय संघाचा 'गब्बर' म्हणजेच शिखर धवनने या नव्या जर्सी फोटो ट्विट केलाय. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी खेळविण्यात येणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ या रेट्रो जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. १९९२ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेवेळी भारतीय संघाने अशीच जर्सी परिधान केली होती. त्यामुळे या जर्सीतून जुन्या भारतीय संघाच्या आठवणींना उजाळा देण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. 

धवनने नव्या जर्सीतील फोटो ट्विट करताच सोशल मीडियावर ९० च्या दशकातील भारतीय संघातील शिलेदारांचे फोटो व्हायरल होत आहेत. अर्थात जुन्या भारतीय संघाची आताच्या संघासोबत तुलना केली जाऊ शकत नाही. पण ऑस्ट्रेलियाच्या भूमीत कांगारुंना पराभूत करुन भारतीय संघ वर्चस्व गाजवणार का? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघशिखर धवनसचिन तेंडुलकर