Join us
Daily Top 2Weekly Top 5

हसीन माझ्या कार्डने शॉपिंग करायची; वर्षभरात संपवले दीड कोटी

हसीनने माझ्या डेबिट कार्डमधून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपये खर्च केल्याचा खुलासा शामीनेच यावेळी केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:28 IST

Open in App
ठळक मुद्देहसीन नेहमीच माझ्याव संशय घ्यायची. आरोप करायची तर तिची जुनीच सवय आहे.

कोलकाता : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीवर त्याची पत्नी हसीन जहाँने गंभीर आरोप केले आहेत. पण या आरोपांना प्रत्यूत्तर द्यायला शामीनेही सुरुवात केली आहे. शामीने मला कधीच न्याय दिला नाही, असे हसीनचे म्हणणे होते. पण हसीनने माझ्या डेबिट कार्डमधून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपये खर्च केल्याचा खुलासा शामीने यावेळी केला आहे. 

गेल्या आठवड्यात हसीनने फेसबुकच्या माध्यमातून शमीवर दगा दिल्याचा आरोप करताना कौटुंबिक कलहाची बळी ठरल्याचे म्हटले होते. दरम्यान, शमीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावताना हा मला बदनाम करण्याचा व कारकीर्द संपविण्याचा कट असल्याचे म्हटले होते.

शमीने इंग्लंडचा व्यापारी मोहम्मद भाईने सांगितल्यानुसार पाकिस्तानी महिला अलिश्बाकडून पैसे घेतले होते, असे म्हणत हसीनने शामीने देशाची फसवणूक केली आहे असा आरोप केला होता. पण हे आरोप बिनबुडाचे आहेत, असे शामीने म्हटले होते. 

शामी एक पत्नी म्हणून मला चांगली वागणूक देत नव्हता, असे हसीनचे म्हणणे होते. पण शामीने आपण कुटुंबियाला वेळ देत होतो, असे सांगितले. तो म्हणाला की, " हसीन नेहमीच माझ्याव संशय घ्यायची. आरोप करायची तर तिची जुनीच सवय आहे. जर मी तिला न्याय देत नव्हतो, असे हसीनचे म्हणणे आहे, पण तसे अजिबात नाही. कारण माझ्या बँकेचे डेबिट कार्ड तिच्याकडेच असायचे. अका वर्षात तब्बल दीड कोटी रुपये हसीनने खर्च केले आहेत. "

टॅग्स :मोहम्मद शामी