Join us

'मी शुभेच्छा देणार नाही', हसीन जहाँचा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या शमीचे कौतुक करण्यास नकार 

मोहम्मद शमीवर ( Mohammad Shami) मॅच फिक्सिंगचे आरोप करणारी त्याची माजी पत्नी हसीन जहाँने ( Hasin Jahan) आता पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 19:37 IST

Open in App

एकेकाळी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर ( Mohammad Shami) मॅच फिक्सिंगचे आरोप करणारी त्याची माजी पत्नी हसीन जहाँने ( Hasin Jahan) आता पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ती म्हणाला की, आपला उद्देश कोणाला लक्ष्य करणे नाही, तर आपले जीवन जगण्याशी संबंधित आहे. तसेच तिने शमीला शुभेच्छा देण्यास नकार दिला आहे. 

मोहम्मद शमी २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहे. या वर्ल्ड कपमध्ये त्याला पहिले चार सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, यानंतर त्याने दमदार पुनरागमन केले आणि मागील ४ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या. या काळात त्याने दोन सामन्यांत पाच बळी घेतले. तसेच तो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक ४५ बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.

हसीन म्हणाली, ''मी क्रिकेट पाहत नाही. मला क्रिकेटमध्ये रस नाही.'' हसीनला जेव्हा विचारण्यात आले की, तुम्ही जरी वर्ल्ड कप पाहत नसला तरी तुमचा क्रिकेटशी संबंध आहे, यावर हसीन जहाँ म्हणाली,  माझी मुलगी बेबो आणि मला क्रिकेटची आवड नाही. आता माझी इच्छा आहे, मी आयुष्य धैर्याने जगावं. मला माझे जीवन जगण्याची चिंता आहे. माझे आयुष्य चांगले चालले आहे.  

टीम इंडियाने २०२३ चा वर्ल्ड कप जिंकला आणि त्यात शमीची महत्त्वाची भूमिका असेल तर कोणतीही चांगली पोस्ट येईल का असे विचारले असता? यावर उत्तर देताना ती म्हणाली, मला काही फरक पडत नाही. त्याने माझ्याशी लग्न केले आहे, ही त्याची जबाबदारी आहे. मला आणि माझ्या मुलीला आधार देण्यासाठी त्याने क्रिकेट खेळून चांगले प्रदर्शन करा, व्यवसाय करा काहीही करा मला पर्वा नाही. त्याचे माझ्याशी चांगले संबंध नाहीत की मी त्याला शुभेच्छा देईन किंवा त्याचे अभिनंदन करेन.  

टॅग्स :मोहम्मद शामीवन डे वर्ल्ड कपऑफ द फिल्ड