Join us

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा आधारस्तंभ कोसळला, हशिम अमलाची निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा अमला हा एकमेव फलंदाज ठरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 20:43 IST

Open in App

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या हशिम अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा अमला हा एकमेव फलंदाज ठरला आहे.

आतापर्यंत अमलाने दक्षिण आफ्रिकेसाठी 124 कसोटी, 181 एकदिवसीय आणि 44 ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक 311 धावा केल्या होत्या. त्रिशतक झळकवणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला होता. आतापर्यंतही दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला त्रिशतक झळकावता आलेले नाही.  

टॅग्स :हाशिम आमलाद. आफ्रिका