Join us

अमलाने मोडला कोहलीचा विक्रम, तुम्हाला माहिती आहे का...

दक्षिण आफ्रिकेची रन मिशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हशिम अमलाने कोहलीचा एक विक्रम मोडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 13:39 IST

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या घडीला बरेच विक्रम पादाक्रांत करताना दिसत आहे. पण दक्षिण आफ्रिकेची रन मिशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हशिम अमलाने कोहलीचा एक विक्रम मोडला आहे.

सध्याच्या घडीला दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका सुरु आहे. शनिवारी या दोन्ही संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला गेला. या सामन्यात अमलाने दमदार शतक लगावले. अमलाच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानपुढे 267 धावांचे आव्हान ठेवता आले होते.

अमलाचे हे एकदिवसीय क्रिकेटमध्ये 27वे शतक होते. अमलाने हे शतक 167 डावांमध्ये केले. पण कोहलीला 27वे शतक झळकावण्यासाठी 169 डाव खेळावे लागले होते.

टॅग्स :विराट कोहलीहाशिम आमला