Bangladesh vs Pakistan : बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पाकिस्तानी गोलंदाज हसन अली यानं २१९ kphच्या वेगानं आणि फिरकीपटू मुहम्मद नवाज यानं १४८kph च्या वेगानं चेंडू टाकला. सामना सुरू असताना जलदगती गोलंदाज हसन अलीनं टाकलेल्या चेंडूचा वेग जेव्हा स्क्रीनवरील पट्टीवर दाखवण्यात आला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हे कमी होतं की काय फिरकीपटू नवाजनं टाकलेल्या चेंडूचा वेग १४८kph दाखवल्यानं चाहते खरंच वेडे झाले. सोशल मीडियावर व्हिडीओही व्हायरल झाले, पण हा सर्व घोळ स्पिडोमीटरच्या बिघाडामुळे झाला. खरं तर हसन अलीनं टाकलेल्या चेंडूचा वेग १३६ mph असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाहा व्हिडीओ...
नवाजनं खरं तर ९२ mphच्या वेगानं चेंडू फेकला.
पाहा व्हिडीओ..
प्रथम फलंदाजी करताना
बांगलादेशला ७ बाद १२७ धावा करता आल्या. अफिफ होसैन ( ३६), महेदी हसन ( ३०) व नुरूल हसन ( २८) यांनी संघासाठी संघर्ष केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅच सोडणारा हसन अली आजच्या सामन्यात चमकला. त्यानं २२ धावांत ३ व विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान ( ११) व बाबर आजम ( ७) ही जबरदस्त जोडी २२ धावांवर माघारी परतली. हैदर अलीही ( ०) लगेच बाद झाला.
पाकिस्तानचा निम्मा संघ ८० धावांवर माघारी परतला. खुशदील शाह व शादाब खान यांनी संघर्ष केला. पण, शोरीफुल इस्लामनं ही भागीदारी तोडताना खुशदीलला ३४ धावांवर बाद केले. १२ चेंडूंत १७ धावांची गरज असताना मोहम्मद नवाजनं दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. अखेरच्या षटकात शादाबनं षटकार खेचून पाकिस्तानचा विजय पक्का केला. पाकिस्ताननं हा सामना ४ विकेट्स व ४ चेंडू राखून जिंकला. शादाब २१ व नवाज १८ धावांवर नाबाद राहिला.