हार्दिक पांड्याची 'लव्ह स्टोरी' पुन्हा सुरू झाली? भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी नवी 'गर्लफ्रेंड' आली! PHOTO व्हायरल

IND vs PAK: हार्दिक पांड्याने बरेच दिवस डेटिंग केल्यानंतर ३१ मे २०२० रोजी नताशा स्टॅन्कोविकसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे लग्न केवळ ३ वर्षेच टिकले आणि गेल्या वर्षी २०२४ मध्ये या दोघांनीही त्यांचे ४ वर्षांचे जुने नाते संपुष्टात आणले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 20:26 IST2025-02-23T20:25:48+5:302025-02-23T20:26:23+5:30

whatsapp join usJoin us
Has Hardik's 'love story' started again New rumored girlfriend jasmine walia seen in India-Pakistan match PHOTO goes viral | हार्दिक पांड्याची 'लव्ह स्टोरी' पुन्हा सुरू झाली? भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी नवी 'गर्लफ्रेंड' आली! PHOTO व्हायरल

हार्दिक पांड्याची 'लव्ह स्टोरी' पुन्हा सुरू झाली? भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी नवी 'गर्लफ्रेंड' आली! PHOTO व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext



आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान याांच्यातील हाय होल्टेड सामना आज खेळला जात आहे. हा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. दरम्यान, या सामन्याच्या बरोबरच भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याचीही चर्चा सुरू आहे. सामन्यातील त्याच्या कामगिरीची चर्चा सुरू असतानाच, त्याच्या पर्सन लाईफचीही चर्चा सुरू झाली आहे. 

खरे तर, या सामन्यादरम्यान जॅस्मिन वालिया स्टेडियममध्ये दिसून आल्यानंतर, ही चर्चा सुरू झाली आहे. कारण सध्या तिचे नाव हार्दिकसोबत जोडले जात आहे. स्टँडमध्ये जॅस्मिनला बघितल्यानंतर, चाहत्यांनाही चेव आला आहे. यातच आता, हार्दिकची लव्ह स्टोरी पुन्ह सुरू झाली आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

जॅस्मिनसोबत जोडलं जातंय नाव -
गेल्या वर्षात हार्दिक पांड्याचे नाव जॅस्मिन वालियासोबत जोडले गेले. हार्दिक पांड्या जॅस्मीन वालियासोबत रिलेशनशिपमध्ये असू शकतो, असा अंदाज रेडिट युजर्सनी व्यक्त केला होता. याशिवया काहींनी ग्रीसमध्ये एकाच ठिकावरील दोघांचे वेगवेगळे फोटोही शेअर केले होते. यावरून दोघेही एकाच वेळी सुट्ट्यांचा आनंद घेत होते, असे समजते. जॅस्मिन वालिया ही ब्रिटिश सिंगर आहे. तिचे इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी भाषेतील गाणेही प्रसिद्ध झाले आहेत. एवढेच नाही तर, हार्दिक आणि जॅस्मिन इंस्टाग्रॅमवर एकमेकांना फॉलोही करतात. 

जस्मिन भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी दुबईला पोहोचली आहे. ती भारतीय संघाला सपोर्ट करत आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने पाकिस्तानच्या सौद शकील आणि बाबर आझम सारख्या महत्वाच्या फलंदाजांचा बळी मिळवला आहे.

2024 मध्ये झाला होता घटस्फोट -
हार्दिक पांड्याने बरेच दिवस डेटिंग केल्यानंतर ३१ मे २०२० रोजी नताशा स्टॅन्कोविकसोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचे लग्न केवळ ३ वर्षेच टिकले. यानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण होऊ लागला. अखेर, गेल्या वर्षी २०२४ मध्ये या दोघांनीही त्यांचे ४ वर्षांचे जुने नाते संपुष्टात आणले. 
 

Web Title: Has Hardik's 'love story' started again New rumored girlfriend jasmine walia seen in India-Pakistan match PHOTO goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.