IND vs NZ, Harshit Rana vs Devon Conway : रायपूरच्या मैदानात दुसऱ्या टी-२० सामन्यात हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. या युवा जलदगती गोलंदाजानं प्रत्येक वेळी संधीचं सोनं करून दाखवलं आहे. हा सामनाही त्याला अपवाद राहिला नाही. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. पहिल्या सामन्यात सिंग इज किंग ठरलेल्या अर्शदीप सिंगच्या षटकात डेवॉन कॉन्वेनं ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १८ धावा केल्या. मग टिम सिफर्टनंही आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. दोघांनी पहिल्या ३ षटकात न्यूझीलंडच्या धावफलकावर ४३ धावा लावल्या होत्या.
हर्षित राणा आला अन् डेवॉन कॉन्वेचा खेळ खल्लास!
चौथ्या षटकात सूर्यकुमार यादवनं आपला हुकमी एक्का काढला. हर्षित राणा गोलंदाजीला आला अन् त्याने आपल्या पहिल्या षटकात डोकेदुखी ठरतोय असे वाटत असलेल्या डेवॉन कॉन्वेला तंबूचा रस्ता दाखवला. हार्दिक पांड्याने तिसऱ्या प्रयत्नात त्याचा यशस्वी झेल टिपला. हर्षित राणानं या विकेटच सेलिब्रेशन एकदम खास अंदाजात केले. चौथ्यांदा धाकड फलंदाजाला बाद केल्याचा त्याने इशारा केला.
न्यूझीलंडच्या धाकड फलंदाजासाठी कर्दनकाळ ठरतोय हर्षित राणा
भारत दौऱ्यावर न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर डेवॉन कॉन्वे चौथ्यांदा हर्षित राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. याआधी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत तिन्ही वेळा हर्षित राणानेच त्याला तंबूचा रस्ता दाखवला होता. पहिल्या टी-२० सामन्यात हर्षित राणा बाकावर बसला होता. तो परतला अन् पुन्हा एकदा त्याने डेवॉन कॉन्वेची विकेट घेतली. हर्षित राणाने २५ चेंडूत कॉन्वेला फक्त १८ धावा देत चार वेळा त्याला आपल्या जाळ्यात अडकवले आहे.
वरुण चक्रवर्तीनंही पहिल्या षटकात साधला विकेटचा डाव
हर्षित राणानं भारतीय संघाला डेवॉन कॉन्वेच्या रुपात पहिले यश मिळवून दिल्यावर वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. त्यानेही आपल्या पहिल्याच षटकात टिम सिफर्टच्या रुपात टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. न्यूझीलंडच्या संघाने दमदार सुरुवात केली. पण हर्षित-वरुण या दोघांनी न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवत संघाला मोठा दिलासा दिला.
Web Summary : Harshit Rana dismissed Devon Conway for the fourth time in the series, becoming a nemesis. His crucial early wicket and unique celebration shifted momentum in India's favor during the T20 match after New Zealand's strong start, supported by Varun Chakravarthy's early breakthrough.
Web Summary : हर्षित राणा ने डेवोन कॉनवे को चौथी बार आउट कर अपना दबदबा कायम किया। न्यूजीलैंड की मजबूत शुरुआत के बाद, उनके महत्वपूर्ण शुरुआती विकेट और अनोखे जश्न ने टी20 मैच में भारत के पक्ष में गति ला दी, जिसमें वरुण चक्रवर्ती ने भी शुरुआती सफलता दिलाई।