IPL 2026 स्पर्धेच्या हंगामाला सुरुवात होण्याआधी शाहरुख खानच्या सह-मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार बॉलिंग ऑलराउंडर हर्षित राणा यंदाच्या हंगामातून बाहेर पडला आहे. फेब्रुवारीमध्ये गुडघ्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता तो आयपीएल स्पर्धेलाही मुकणार आहे. 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशच्या मुस्ताफिझुर रहमानच्या जागी झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजारबानी याला KKR नं संधी दिली. ही उणीव भरून काढल्यानंतर आता KKR फ्रँचायझी संघ हर्षित राणाच्या जागी कोणाला संधी देणरा? हा प्रश्न चर्चेत आला आहे. शाहरुखच्या ताफ्यातून हर्षित राणा आउट झाल्यावर मुंबई इंडियन्समधून चमकलेल्या गोलंदाजासह ३ चेहरे 'पिक्चर'मध्ये आले असून यातील एकाला यंदाच्या हंगामता संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
IPL 2026: KKRला मिळाला मुस्तफिजुरचा पर्याय; ऑस्ट्रेलियाला रडवणारा ६.८ फुटी गोलंदाज आला संघात
आकाश मधवाल
आयपीएल २०२६ च्या हंगामात हर्षितच्या जागी येऊ शकणाऱ्या खेळाडूंमध्ये आकाश मधवालच्या नावाचा समावेश आहे. २०२३ आणि २०२४ च्या हंगामता मुंबई इंडियन्सच्या संघाकडून चमकलेला हा चेहरा गत हंगामात १ कोटी २० लाख प्राइज टॅगसह राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना दिसला होता. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत १७ सामन्यात २३ विकेट्स घेतल्या आहेत.
चेतन सकारिया
डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया हा देखील पर्याय ठरू शकतो. त्याने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दोन टी २० आणि एक वनडे सामना भारताकडून खेळला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघात तो उमरान मलिक याच्या रिप्लेसमेंट म्हणून सामील झाला होता. आयपीएलमध्ये त्याने एकूण २० सामने खेळून २० विकेट्स घेतल्या आहेत.
नवदीप सैनी
नवदीप सैनी याने २०१८-१९ च्या सुमारास आपल्या वेगामुळे खूप लक्ष वेधलं होतं. त्यावेळचे भारतीय कर्णधार विराट कोहली यांचंही त्याच्याकडे लक्ष गेलं आणि त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळाली. मात्र सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला आणि संघाबाहेर पडला. गेल्या काही वर्षांत तो आयपीएलमध्येही दिसलेला नाही. तरीही, हर्षितच्या जागी तो एक पर्याय ठरू शकतो. आयपीएलमध्ये त्याने ३२ सामने खेळून २३ विकेट्स घेतल्या आहेत.
Web Summary : KKR faces a blow as Harshit Rana exits IPL 2026 due to injury. Akash Madhwal, Chetan Sakariya, and Navdeep Saini are potential replacements being considered. Mumbai Indians' Madhwal is a strong contender.
Web Summary : चोट के कारण हर्षित राणा के आईपीएल 2026 से बाहर होने पर केकेआर को झटका लगा है। आकाश मधवाल, चेतन सकारिया और नवदीप सैनी संभावित विकल्प हैं जिन पर विचार किया जा रहा है। मुंबई इंडियंस के मधवाल प्रबल दावेदार हैं।