IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम

Harshal Patel records, IPL 2025 SRH vs LSG: लखनौविरूद्ध खेळताना हर्षल पटेलने हा खास विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:23 IST2025-05-20T17:19:18+5:302025-05-20T17:23:14+5:30

whatsapp join usJoin us
Harshal Patel faster than Lasith Malinga and Jasprit Bumrah to take 150 wickets in IPL history | IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम

IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Harshal Patel records, IPL 2025 SRH vs LSG: सनरायजर्स हैदराबादने सोमवारच्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्स संघाला पराभूत केले. हैदराबादचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर गेला होता. पण या पराभवासह लखनौचे आव्हानही संपुष्टात आले. लखनौने प्रथम फलंदाजी करताना मिचेल मार्श (६५) आणि एडन मार्करम (६१) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर २०५ धावांची दमदार धावसंख्या उभारली. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने अभिषेक शर्मा (५९), हेनरिक क्लासेन (४७) आणि इशान किशन (३५) या तिघांच्या फटकेबाजीच्या जोरावर १८.२ षटकांतच सामना जिंकला. हैदराबादच्या संघाची गोलंदाजी फारशी चांगली झाली नाही, पण हर्षल पटेलने एकमेव विकेट मिळवत मोठा विक्रम रचला.

लखनौ संघाच्या फलंदाजीच्या वेळी १६व्या षटकात हर्षल पटेल आला. त्याने एडन मार्करमला गोलंदाजी केली. ३८ चेंडूत दमदार ६१ धावांवर खेळणारा मार्करम हर्षलच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. हर्षल पटेलसाठी ती विकेट म्हणजे IPL कारकिर्दीतील १५० वा बळी ठरला. त्याने IPL मध्ये २३८१ चेंडू टाकून १५०वा बळी मिळवला.

हर्षल पटेलचा मोठा पराक्रम

हर्षल पटेलने १५०वा बळी घेत एक विक्रम रचला. तो सर्वात जलद १५० बळी घेणारा गोलंदाज ठरला. याआधी हा विक्रम मुंबई इंडियन्सचालसिथ मलिंगा याच्या नावावर होता. त्याने IPL कारकिर्दीतील २४४४ व्या चेंडूवर १५०वा बळी टिपला होता. तर सध्या पंजाबकडून खेळणारा युजवेंद्र चहल याने २५४३व्या चेंडूवर १५० वा बळी घेतला होता. जसप्रीत बुमराहदेखील या यादीत खूप मागे आहे. त्यामुळे हर्षल पटेलने नवा इतिहास रचला.

Web Title: Harshal Patel faster than Lasith Malinga and Jasprit Bumrah to take 150 wickets in IPL history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.