Join us

कोट्यवधीवर पाणी सोडत BCCI शी पंगा! IPL मध्ये बंदी घालण्यात आलेल्या क्रिकेटरला लागली कॅप्टन्सीची लॉटरी

हा क्रिकेट आता व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:12 IST

Open in App

Harry Brook Confirmed As Englands New White Ball Captain : देशात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा माहोल आहे. दरम्यान जगातील या मोठ्या स्पर्धेतील मेगा लिलावात मोठी बोली लागल्यावर स्पर्धेतून माघार घेणाऱ्या गड्याला कॅप्टन्सीची लॉटरी लागली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर इंग्लंडच्या संघाचे कॅप्टन्सी सोडणाऱ्या जोस बटलरच्या जागी इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने हॅरी ब्रूकची निवड केली आहे. हा क्रिकेट आता व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व करताना दिसेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बीसीसीआयनं घातली बंदी; पण आता त्याच खेळाडूला मिळाली कॅप्टन्सीची नामी संधी

आयपीएल २०२५ स्पर्धेआधी झालेल्या मेगा लिलावात हॅरी ब्रूक याच्यावर दिल्ली कॅपिटल्स संघाने ६.२५ कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण या गड्याने नॅशनल ड्युटी महत्त्वाची आहे, असे सांगत कोट्यवधीवर पाणी सोडतं आयपीएलमधून माघार घेतली होती. या निर्णयामुळे बीसीसीआयने नव्या नियमावलीनुसार, त्याच्यावर आयपीएलमध्ये दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली. आयपीएलच्या नव्या नियमाचा शिकार होणारा तो पहिला क्रिकेटर ठरला होता. IPL मधील बंदीनंतर त्याला आता नेतृत्वाची मोठी संधी मिळाल्याचे दिसते. 

IPL 2025 : कोट्यवधीसह मिळाली होती संधी; बीसीसीआयनं या स्टार क्रिकेटरवर घातली २ वर्षांची बंदी

टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यातच मिळाले होते संकेत

जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाची कामगिरी सातत्याने घसरल्याचे पाहायला मिळाले. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत संघ तळाला राहिला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही इंग्लंडच्या संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील निराशजनक कामगिरीनंतर जोस बटलरनं संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला. त्याने कर्णधारपद सोडल्यावर भारतीय दौऱ्यावर उप कर्णधाराची जबाबदारी खांद्यावर पडलेला हॅरी ब्रूकच कर्णधार होईल, याचे संकेत मिळाले होते. आता त्यावर फायनल शिक्कामोर्तब झालाय. 

हॅरी ब्रूकची कामगिरी 

हॅरी ब्रूक याने अल्पावधीत आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास छाप  सोडली आहे. २६ वनडे सामन्यात त्याने  ३४ च्या सरासरीसह८१६ धावा केल्या असून  ११० ही त्याची सर्वोच्च खेळी आहे. आंतरराष्ट्रीय २० मध्ये  ४४ सामन्यात त्याच्या नावे ७८९ धावा आहेत. यात ८१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर पडल्यावर तो कशी कामगिरी करणार? संघाची कामगिरी उंचावण्यात तो यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :इंग्लंडबीसीसीआयइंडियन प्रिमियर लीग २०२५