Harry Brook Banned From IPL For Two Years : आयपीएल २०२५ च्या हंगामाला सुरुवात होण्याआधी बीसीसीआयने (BCCI) दगाबाज परदेशी खेळाडूवर नव्या नियमानुसार बंदीची कारवाई केलीये. इंग्लंडचा क्रिकेटर हॅरी ब्रूक याने लिलावात बोली लागल्यावर यंदाच्या हंगामात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे जगातील लोकप्रिय स्पर्धेत २ वर्षांची बंदी घालण्यात आलेला तो पहिला क्रिकेटर ठरलाय. आयपीएलच्या मेगा लिलावाआधीच बीसीसीआयने या स्पर्धेसंदर्भात काही नवे नियम जाहीर केले होते. वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूला दोन वर्षे या स्पर्धेचे दरवाजे बंद होतील, हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! मेगा लिलावात नाव नोंदवलं, कोट्यवधीची बोली लागली
इंग्लंडच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाजाने मेगा लिलावात नाव नोंदणी केली. एवढेच नाही तर हजारो खेळाडूंच्या यादीतून त्याचे नाव शॉर्टलिस्ट करण्यात आले आणि त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची मोठी बोलीही लागली. दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं ६.२५ कोटी मोजत त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. पण हंगामाला सुरुवात होण्याआधी त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. सलग दुसऱ्यांदा त्याने बोली लागल्यावर स्पर्धेतून माघार घेतलीये. पण यावेळी मात्र कायदा दाखवत बीसीसीआयने त्याला दोन वर्षांसाठी आउट केलंय.
परदेशी खेळाडूंच्या मनमानीला लगाम घालण्यासाठी बीसीसीआयने आणला होता हा नियम
इंडियन एक्सप्रेसनं बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयनं हॅरी ब्रूकवर आयपीएलमध्ये २ वर्षांच्या बंदीची कारवाई केल्याची माहिती इंग्लंड अँण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाला कळवली आहे. बहुतांश परदेशी खेळाडूंनी याआधीही आयपीएलच्या तोंडावर स्पर्धेतून माघार घेतल्याच्या घटना घडल्या होत्या. खेळाडूंनी अचानक स्पर्धेतून काढता पाय घेतल्यावर फ्रँयायझी संघाचीही गोची होते. खेळाडूंच्या या वृत्तीवर लगाम घालण्यासाठी बीसीसीआयने आयपीएल २०२५ च्या हंगामाआधी परदेशी खेळाडूंच्या अनुषंगानेच कठोर नियम केला. दुखापतीशिवाय वैयक्तिक कारणास्वत खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली तर २ वर्षे खेळाडूला आयपीएलचे दरवाजे बंद करण्यात येतील, असा नियम आला. या हंगामाच्या सुरुवातील इंग्लंडचा क्रिकेटर या नियमाच्या कचाट्यात सापडलाय.