आयपीएल खेळला, रणजीमध्ये कप्तानीही केली, आता दाखल झाला गुन्हा, या क्रिकेटपटूच्या मागे लागले पोलीस 

Harpreet Singh Bhatia News: आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पुणे वॉरियर्सकडून खेळलेला क्रिकेटपटू हरप्रीत सिंह भाटिया याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरप्रीत छत्तीसगड क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 06:17 PM2022-05-12T18:17:09+5:302022-05-12T18:17:56+5:30

whatsapp join usJoin us
Harpreet Singh Bhatia: He played in IPL, also captained in Ranji, now a crime has been registered, the police went after this cricketer | आयपीएल खेळला, रणजीमध्ये कप्तानीही केली, आता दाखल झाला गुन्हा, या क्रिकेटपटूच्या मागे लागले पोलीस 

आयपीएल खेळला, रणजीमध्ये कप्तानीही केली, आता दाखल झाला गुन्हा, या क्रिकेटपटूच्या मागे लागले पोलीस 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

रायपूर - आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पुणे वॉरियर्सकडून खेळलेला क्रिकेटपटू हरप्रीत सिंह भाटिया याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरप्रीत छत्तीसगड क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हरप्रीत सिंह भाटिया याने बनावट मार्कशिटचा वापर केला, असा आरोप ठेवण्यात आला आहे. तया प्रकरणात विधानसभा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हरप्रीत सिंह याने २०१४ मध्ये क्रिकेटरच्या कोट्यामधून लेखा परीक्षक लेखापाल पदासाठी अर्ज केला होता. अर्जासोबत त्याने आपली कागदपत्रेही दिली होती. त्याने झाशीमधील बुंदेलखंड युनिव्हर्सिटीचं ग्रॅज्युएशन मार्कशिट जमा केलं होतं. त्याची लेखापाल पदासाठी निवडही झाली होती. मात्र या कागदपत्रांची पडताळणी केली असता की कागदपत्रे बनावट निघाली. हरप्रीतच्या शेवटच्या वर्षातील अनुक्रमांक तिथे नोंदच नसल्याचे विद्यापीठाकडून मिलालेल्या माहितीमधून निष्पन्न झाले.

युनिव्हर्सिटीकडून प्राप्त माहितीच्या आधारावर त्या कार्यालयाकडून सरकारी कामकाज आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी हरप्रीत भाटियाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हरप्रीत भाटियाचा शोध घेत आहेत. दरम्यान, तो क्रिकेट खेळण्यासाठी पंजाबमध्ये गेला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाच्या पूर्ण तपासानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याने हरप्रित सिंह भाटियाला छत्तीसगडच्या संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच आता बीसीसीआयसुद्धा याबाबत चौकशी करत आहे. 

३० वर्षांच्या हरप्रीत सिंह भाटिया याने २०१० ते २०१२ या काळात आयपीएलमध्ये चार सामने खेळले होते. २०१७ मध्ये सर्फराज खान जखमी झाल्यानंतर आरसीबीने त्याला आपल्या संघात घेतले. मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. हरप्रीतने २००८ मध्ये मध्य प्रदेशकडून देशांतर्गत स्पर्धेत पदार्पण केलं होतं. त्यानंतर २०१८-१९ च्या रणजी करंडक स्पर्धेच्या आधी त्याने छत्तीसगडच्या संघात ट्रान्सफर घेतली. त्याने ७० प्रथमश्रेणी सामन्यात ४४८९ आणि ७७ लिस्ट ए सामन्यत २५०७ धावा फटकावल्या आहेत. 

Web Title: Harpreet Singh Bhatia: He played in IPL, also captained in Ranji, now a crime has been registered, the police went after this cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.