Join us  

"हार्दिकला विश्वचषकात ‘मॅच फिनिशर’ म्हणून प्रथम पसंती" 

हार्दिकमुळे संघ संतुलित होतो - शिवरामकृष्णन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 9:31 AM

Open in App
ठळक मुद्देहार्दिकमुळे संघ संतुलित होतो - शिवरामकृष्णन

‘मॅच फिनिशर या नात्याने मी हार्दिक पांड्या याला पहिली पसंती देईन. हार्दिक तडाखेबंद फटकेबाजीसह सामन्याचा निकाल पालटण्याची ताकद बाळगतो.     टी-२० विश्वचषकात तो महेंद्रसिंंग धोनीसारखीच भूमिका वठवेल,’ असा विश्वास भारतीय संघाचे माजी लेगस्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी व्यक्त केला आहे.‘शिखर धवन हा अद्याप निवडकर्त्यांच्या नजरेत असल्यामुळेच त्याला लंका दौऱ्यावर पाठविण्यात आले. असे नसते तर त्याच्याऐवजी एखाद्या युवा खेळाडूला पाठविले असते,’ असे ते म्हणाले. 

१९८०च्या दशकात भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर शिवरामकृष्णन यांनी नऊ कसोटीत २६ गडी बाद केले. सध्या ते आयसीसीत खेळाडूंचे प्रतिनिधी आहेत. एका मुलाखतीत शिवरामकृष्णन यांनी धवनला भारतीय संघात लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्याकडून कडवे आव्हान असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘धवनकडे अनुभव तसेच फटके मारण्याची क्षमता आहे. संघाच्या विजयात योगदान देणारा खेळाडू अशी त्याची ख्याती आहे. 

मर्यादित षटकांच्या सामन्यात धवनचा रेकॉर्ड चांगलाच आहे. राहुल हा टी-२० प्रकारात देशाकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्ध मालिकेत धवनच्या सोबतीला पृथ्वी सलामीला खेळेल. पृथ्वी ऑफ साइडला शानदार खेळतो; पण लेग साइडला फटके मारण्याची क्षमता वाढविण्याची गरज आहे. फिटनेस, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तीनही गोष्टींकडे त्याने लक्ष द्यावे.’

टॅग्स :भारतएम. एस. धोनीहार्दिक पांड्या