भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानं २०२० वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगाला शॉक दिला... दुबईत त्यानं गुपचूप बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच ( Natasha Stankovic) हिच्यासोबत साखरपूडा केला. हा झटका कमी होता की काय, लग्नाआधीच नताशा प्रेग्नेंट असल्याचे समोर आले होते. हार्दिक - नताशा यांचा मुलगा दोन वर्षांचा होण्याआधीच पांड्या कुटुंबात पुन्हा एकदा पाळणा हलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पांड्या कुटुंबीयांनी ख्रिस्मसचं सेलिब्रेशन केलं आणि त्यात दिसणाऱ्या नताशाच्या फोटोमुळे हार्दिक पुन्हा बाबा बनणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
पांड्या कुटुंबियांनी घरी दणक्यात ख्रिस्मस साजरा केला. त्यात नताशा गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. पण, त्यात दिसणारे तिचे ‘baby bump’ लक्ष वेधून घेत आहे. तिच्या फोटोखाली अनेकांनी नताशाला तू प्रेग्नेंट आहेस का, अशी विचारणा केली आहे.
नताशा आणि हार्दिक यांनी ३१ मे २०२० ला लग्न केलं आणि ३० जुलै २०२० मध्ये दोघंही आई-बाबा बनले. अगस्त्या हे त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव आहे.