हार्दिक-माहिकाच्या प्रेमाचा स्वॅग! जाणून घ्या दोन बिबट्यांच्या डिझाईनसह साकारलेल्या टॅटूत दडलेली गोष्ट

हार्दिक-माहिकाच्या नात्याला अधोरेखित करणारा टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:44 IST2026-02-14T12:41:23+5:302026-02-14T12:44:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya's Stunning Valentine's Day Gift For Mahieka Sharma A New Meaningful Tattoo Relationship | हार्दिक-माहिकाच्या प्रेमाचा स्वॅग! जाणून घ्या दोन बिबट्यांच्या डिझाईनसह साकारलेल्या टॅटूत दडलेली गोष्ट

हार्दिक-माहिकाच्या प्रेमाचा स्वॅग! जाणून घ्या दोन बिबट्यांच्या डिझाईनसह साकारलेल्या टॅटूत दडलेली गोष्ट

Hardik Pandya's Stunning Valentine's Day Gift For Mahieka Sharma With Meaningful Tattoo : भारतीय क्रिकेटर अन् टॅटू प्रेम हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. हार्दिक पांड्या याबाबतीत आघाडीवर असणारा क्रिकेटर आहे. टॅटू हा फक्त  स्टाईल स्टेटमेंटचा भाग नाही तर नात्यातील प्रेम व्यक्त करण्याच एक सर्वोत्तम माध्यम आहे. पांड्याने त्याचा आधार घेत माहिकासोबतच्या प्रेमाचा गोडवा जपण्याला पसंती दिली आहे. हार्दिक पांड्याने आपल्या आयुष्यातील पार्टनर माहिकावरील प्रेम व्यक्त करणारा टॅटू आपल्या मानेवर काढला आहे. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगताना दिसते. इथं जाणून घेऊयात टॅटूत दडलेली खास गोष्ट

हार्दिक-माहिकाच्या नात्याला अधोरेखित करणारा टॅटू


एलीअन्स टॅटू स्टुडिओमध्ये प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट सन्नी भानुशाली आणि प्रमुख आर्टिस्ट तुषार मरणे या जोडीनं हार्दिक पांड्याचा टॅटू काढला आहे. मानेवर माहिराच्या नावाचे M हे आद्याक्षर कोरले आहे. एवढेच नाही तर या टॅटूत दोन बिबट्यांचे चित्रही रेखाटल्याचे दिसते. यातील एक बिबट्या वास्तववादी आहे जो दृश्यमान ताकद, धाडस आणि महत्वाकांक्षा दर्शवतो. दुसरा बिबट्या सहज आणि प्रवाही रेषांद्वारे तयार केला आहे, जो पहिल्या बिबट्याच्या भोवती सावलीसारखा फिरतो अन् M हे अध्याक्षर तयार होते. अर्थपूर्ण टॅटूसह हार्दिक पांड्याने माहिकाला खास Valentine's Day Gift दिले आहे. 

विश्वास आणि भावनेचा सुरेख संगम दाखवमारा टॅटू

सन्नी भानुशाली याने क्रिकेटच्या टॅटूसंदर्भातील गोष्ट शेअर करताना म्हटले आहे की, हार्दिक पांड्याला फक्त M नावाचा टॅटू काढायचा होता. पण डिझाईनची चर्चा करताना बिबट्या दोघांच्या नात्यातील उत्तम रुपकाच्या रुपात रेखाटला गेला.  हा टॅटू विश्वास आणि भावना यांच्या माध्यमातून तयार झाला आहे, असेही त्याने म्हटले आहे.  एलीअन्स टॅटूच्या मते, हा टॅटू आधुनिक नातेसंबंधांचे प्रतिनिधित्व करतो, जिथे व्यक्तिमत्त्व टिकवून ठेवले जाते आणि जोडीदारीमुळे दोघांची शक्ती वाढते. बिबट्याचे प्रतीक अधिकार गाजवण्याऐवजी दोघांमधील संतुलन soulmate सारखे संरेखन दाखवते. हार्दिक पांड्या हा नव्या नात्यात आल्यापासून सातत्याने माहिकासोबतच खास बाँडिंग दाखवून देताना दिसला आहे. यात आता नव्या टॅटूची भर पडली आहे.

Web Title : हार्दिक पांड्या का टैटू: माहीका शर्मा के लिए प्यार स्याही में उकेरा गया

Web Summary : हार्दिक पांड्या का नया टैटू माहीका शर्मा के लिए उनके प्यार को व्यक्त करता है। दो तेंदुए ताकत और तरलता का प्रतीक हैं, डिजाइन में माहीका का प्रारंभिक अक्षर 'M' शामिल है। टैटू उनके आधुनिक रिश्ते का प्रतिनिधित्व करता है, जो व्यक्तित्व और साझा शक्ति को संतुलित करता है, जो एक सोलमेट कनेक्शन को दर्शाता है।

Web Title : Hardik Pandya's Tattoo: Love for Mahieka Sharma Etched in Ink

Web Summary : Hardik Pandya's new tattoo expresses his love for Mahieka Sharma. Featuring two leopards symbolizing strength and fluidity, the design incorporates Mahieka's initial 'M'. The tattoo represents their modern relationship, balancing individuality and shared power, reflecting a soulmate connection.