ती हार्दिक पांड्यासाठी झाली 'चीअर गर्ल'! ..अन् मिळाली दोघांचे सूत जुळल्याची एक हिंट

हार्ड हिटिंग पांड्याच्या षटकारांच्या आतषबाजीनंतर सोशल मीडियावर ती सुंदरी पुन्हा चर्चेत आलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 15:17 IST2025-03-05T15:10:39+5:302025-03-05T15:17:31+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya’s Rumoured Girlfriend Jasmin Walia Cheers As He Hits Big Sixes At The Match Viral Pics Hint Of Cricketer New Relationship | ती हार्दिक पांड्यासाठी झाली 'चीअर गर्ल'! ..अन् मिळाली दोघांचे सूत जुळल्याची एक हिंट

ती हार्दिक पांड्यासाठी झाली 'चीअर गर्ल'! ..अन् मिळाली दोघांचे सूत जुळल्याची एक हिंट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघानं अगदी तोऱ्यात फायनल गाठली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी वेळी एक विकेट खात्यात जमा करणाऱ्या हार्दिक पांड्यानं अखेरच्या षटकात आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश केला. २८ धावांच्या छोट्याखानी खेळीत पांड्यानं एक चौकारासह तीन उत्तुंग षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. हार्ड हिटिंग पांड्याच्या षटकारांच्या आतषबाजीनंतर सोशल मीडियावर ती सुंदरी पुन्हा चर्चेत आलीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारतीय संघाच्या सामन्यावेळी पुन्हा दिसलेली ती सुंदरी दुसरी तिसरी कोणी नसून ती  जास्मिन वालिया (Jasmin Walia) आहे. जिचं नाव सध्या हार्दिक पांड्याशी जोडलं जातं आहे.   

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

आधी चर्चा रंगली; आता तर तिने पांड्यासोबत सूत जुळल्याची हिंटच दिली

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सामन्यात सर्वात आधी तिची झलक पाहायला मिळाली होती. त्यानंतर सातत्याने ती स्टेडियमवर स्पॉट झाली. नताशासोबत घटस्फोट झाल्यावर हार्दिक पांड्याच्या आयुष्यात जास्मिन वालियाच्या रुपात नव्या प्रेमाची एन्ट्री झालीये अशी चर्चा रंगत असताना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात तिने हार्दिक पांड्यासोबत १०० टक्के सूत जुळल्याची एक हिंटच दिली आहे. ज्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.   

तिच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद काही औरच

 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनल लढतीत हार्दिक पांड्या मैदानात उतरला त्यावेळी भारतीय संघाला बॉल टू रन अशा धावा करायच्या होत्या.  एक विकेट पडली की, सामन्यात पुन्हा एखादे ट्विस्ट येईल, अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याने तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. त्याने मारलेले षटकार क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे अन् कांगारुंच्या डोळ्यात पाणी आणणारे असेच होते. प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी त्याची फटकेबाजी आनंद देणारी होती. पण स्टँडमध्ये बसून मॅचचा आनंद घेणाया जास्मिन वालियाचा आनंद हा अगदी गगनाला भिडलेला होता. ती अगदी उड्या मारून नाचत अन् मोठ्या मोठ्यानं ओरडून पांड्याच्या सिक्सरला दाद देताना दिसली.

ती पांड्यासाठी चीअर गर्ल झाली अन्...

पांड्यासाठी चीअर गर्ल होत तिने त्याच्यासोबत रिलेशनशिपच्या चर्चा खरीये,हेच संकेत दिलेत. एका बाजूला पांड्याची एक्स वाइफ नताशा तिचा बर्थडे साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला जास्मिनला पांड्यासाठी चीअर करताना बघून नेटकरी या जोडीची लव्हस्टोरी हिट होईल, अशा आशयाच्या प्रतिक्रियाही देत आहेत.
 

Web Title: Hardik Pandya’s Rumoured Girlfriend Jasmin Walia Cheers As He Hits Big Sixes At The Match Viral Pics Hint Of Cricketer New Relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.