Join us

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!

वडोदरा येथे 6000 स्क्वेअर फिटाचं आहे आलिशान पेंटहाऊस..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 10:26 IST

Open in App

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या प्रेयसीसोबतच्या गुपचूप लग्नामुळे चर्चेत आहे. हार्दिकनं काही दिवसांपूर्वी त्याची प्रेयसी नताशा स्टँकोव्हिच प्रेग्नंट असल्याची गुड न्यूज दिली. बडोदा ते मुंबई इंडियन्स आणि टीम इंडिया... हार्दिक पांड्याचा हा प्रवास सर्वांना प्रेरणादायी आहे. अल्पावधीतच त्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर देशातील श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. त्याचे स्टायलिस्ट राहणीमान पाहून त्याची प्रचिती येतेच. हार्दिक पांड्याचं गुजरातमधील वडोदरा येथे 6000 स्क्वेअर फिटचं आलिशान पेंटहाऊस आहे. चला तर मग करूया त्याच्या या लय भारी घराची सफर....  

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये हार्दिकचं नाव घेतलं जातं. सध्या त्याचा पगार हा जवळपास 11.4 कोटींच्या घरात आहे. फोर्ब्सनं 2019मध्ये जाहीर केलेल्या 100 श्रीमंत सेलिब्रेटींमध्ये हार्दिक 32व्या स्थानावर होता. सुरुवातीच्या काळात सेकंड हँड गाडी घेऊन क्रिकेटच्या सरावाला जाणाऱ्या हार्दिककडे Land Rover Range Rover Vogue आणि Mercedes AMG G63 SUV अशा गाड्या आहेत.  होम थिएटर... गणपती बाप्पांना विराजमान करण्यासाठीची स्पेशल जागा लिव्हींग रूम जिम  

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रुणाल पांड्यावडोदरानताशा स्टँकोव्हिच