Join us
Daily Top 2Weekly Top 5

नताशाच्या प्रेमात हार्दिक पांड्या बनला 'बावर्ची'; बनवली स्पेशल डिश

हार्दिकनं काही दिवसांपूर्वी प्रेयसी नताशा प्रेग्नंट असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 14:48 IST

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का देत आला आहे. 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यानं बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसोबत साखरपुडा करण्याचे जाहीर केले. त्याच्या साखरपुड्याची कल्पना घरच्यांनाही नव्हती. शिवाय त्यानं गेल्या महिन्यात नताशा प्रेग्नंट असल्याचे जाहीर करून गुपचूप लग्नही उरकले. बाप होण्याची जबाबदारी खांद्यावर आल्यापासून हार्दिक जबाबदार झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रेग्नंट नताशाला प्रसन्न ठेवण्यासाठी त्यानं फुलांचा गुच्छा भेट दिला होता. आता तर त्यानं चक्क किचनमध्ये प्रवेश करताना स्पेशल डिश बनवली आहे.

हार्दिकनं काही दिवसांपूर्वी प्रेयसी नताशा प्रेग्नंट असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नताशा हार्दिकच्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे. हार्दिकनं ही गुड न्यूज देताना गपचूप लग्नही केलं. नताशाच्या बेबी शॉवरचे फोटोही व्हायरल झाले होते. आता हार्दिकनं नताशासाठी फुलांचा गुच्छ आणला. गुलाबी रंगांच्या गुलाबांचा गुच्छ पाहून नताशाच्या चेहऱ्यावरील आनंद हार्दिकनं त्याच्या कॅमेरात टिपलं आहे. नताशानं हा क्षण तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिनं लिहिलं की,''तू माझा आयुष्यभराचा साथी आहेस..'' 

हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली. हार्दिकच्या या सरप्राईजबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हते.  मुंबईत एका पार्टित या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. नताशानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केलं आहे. बाप होण्याची जबाबदारी पेलण्यासाठी हार्दिक सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. तो आता स्वयंपाक शिकत आहे. त्यानं खास चिज बटर मसाला, ही डिश तयार केली. सोशल मीडियावर त्यानं तो फोटो पोस्ट केला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनसह अनेकांनी त्याचं कौतुक केलं. नताशानंही लव्ह सिम्बॉल पोस्ट केली.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

 

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, तरीही IPL 2020 होऊ न देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील; आखला खास प्लान

पाकिस्तानचे 10 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं विचारले दोन खोचक प्रश्न!

सचिन तेंडुलकरवर मात; राहुल द्रविड ठरला 50 वर्षांतील सर्वोत्तम भारतीय कसोटी फलंदाज!

भावांनो कोरोनाला लेचापेचा समजू नका; 10 क्रिकेटपटू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शाहिद आफ्रिदीचे आवाहन  

गोलमाल है भाई...! काल कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला पाकिस्तानचा खेळाडू आज झाला निगेटिव्ह

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच