Join us

प्रेग्नंट प्रेयसीला खूश ठेवण्यासाठी हार्दिक पांड्याची खटपट; स्पेशल गिफ्ट पाहून नताशा म्हणते...

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनण्याचा आनंद लपवू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 14:02 IST

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनण्याचा आनंद लपवू शकत नाही. त्यामुळे प्रेयसी नताशा स्टँकोव्हिचला खूश ठेवण्यासाठी हार्दिकची खटपट सुरू आहे. हार्दिकनं नताशाला स्पेशल गिफ्ट दिलं आणि नताशानं रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या दोघांनी पोस्टवर रोमँटिक मॅसेजही लिहिला आहे. हार्दिकनं काही दिवसांपूर्वी प्रेयसी नताशा प्रेग्नंट असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नताशा हार्दिकच्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे. हार्दिकनं ही गुड न्यूज देताना गपचूप लग्नही केलं. त्यानं शेअर केलेल्या फोटोवरून तसा अंदाज बांधला जात आहे. 

नताशा बेबी शॉवरचे फोटोही व्हायरल झाले होते. आता हार्दिकनं नताशासाठी फुलांचा गुच्छ आणला. गुलाबी रंगांच्या गुलाबांचा गुच्छ पाहून नताशाच्या चेहऱ्यावरील आनंद हार्दिकनं त्याच्या कॅमेरात टिपलं आहे. नताशानं हा क्षण तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. तिनं लिहिलं की,''तू माझा आयुष्यभराचा साथी आहेस..'' 

हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली. हार्दिकच्या या सरप्राईजबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हते.  

भारतीयांवर भडकली 'पॉर्न स्टार' रेनी ग्रेसी; दिली कायदेशीर कारवाईची धमकी!  

माझं घरच तू होतीस गं... आईच्या निधनानंतर SRHच्या क्रिकेटपटूला दुःख अनावर

सुशांत सिंग राजपूतला दिलेलं वचन पूर्ण करता येणार नाही; मुंबई इंडियन्सचा खेळाडू झाला भावनिक

भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीच्या डोक्यात आलेला आत्महत्येचा विचार, पण...

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच