Join us

हार्दिक पांड्याने दिलं सरप्राइज गिफ्ट, वडील झाले इमोशनल 

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका दौ-यात दमदार प्रदर्शन केल्याने हार्दिक भलताच खूष आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 13:33 IST

Open in App

मुंबई, दि. 17 - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. श्रीलंका दौ-यात दमदार प्रदर्शन केल्याने हार्दिक भलताच खूष आहे. आपल्या यशाचं श्रेय त्याने वडिलांना दिलं आहे. पल्लेकल कसोटीत मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या पांड्याने कसोटी मालिका संपल्यानंतर आपल्या वडिलांचे आभार मानले आणि त्यांना एक सरप्राइज गिफ्ट दिलं.हार्दिकने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये त्याचे वडिल एका कार शो-रूमजवळ आहेत. तेथे त्यांच्यासमोर एक लाल रंगाची चमकती कार उभी आहे. त्यांना काहीही कल्पना नव्हती की ही कार त्यांच्यासाठी आहे. तेथे असलेल्या शोरूमच्या कर्मचा-यांनी त्यांना आपण या कारचे मालक आहेत असं सांगितल्यावर ते चांगलेच हैराण झाले. त्यांना विश्वास बसत नव्हता पण हार्दिकने त्यांना सरप्राइज गिफ्ट दिल्याचं सांगितल्यावर त्यांचा विश्वास बसला. त्यानंतर हार्दिकसोबत व्हिडीओ चॅटिंग करताना ते भावनिक झाले. 

त्यानंतर हार्दिकने एकापाठोपाठ एक चार ट्विट केले. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून समाधान वाटतंय...या व्यक्तिला आयुष्यातील सर्व सुख यांच व्यक्तिला मिळावे...माझे वडील. दुस-या टविटमध्ये तो म्हणतो,  त्यांनी माझ्या आणि क्रृणालसाठी जे काही केलंय त्यासाठी मी त्यांचं जितके आभार मानावे तितके कमी आहेत. त्यांच्यासाठी हे एक छोटंस सरप्राइज गिफ्ट.