'विराट कोहली नाही, तर 'हा' खेळाडू आहे भारतीय संघातील सुपरस्टार'; सांगतोय कायरन पोलार्ड

स्वत:मध्ये जे बदल करतात आणि आपली दखल घ्यायला लावतात, ते सुपरस्टार असतात असे पोलार्डचे म्हणणे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 17:15 IST2019-08-31T17:14:02+5:302019-08-31T17:15:54+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
hardik pandya is superstar of indian cricket- kieron pollard | 'विराट कोहली नाही, तर 'हा' खेळाडू आहे भारतीय संघातील सुपरस्टार'; सांगतोय कायरन पोलार्ड

'विराट कोहली नाही, तर 'हा' खेळाडू आहे भारतीय संघातील सुपरस्टार'; सांगतोय कायरन पोलार्ड

नवी दिल्ली : भारतीय संघातील सुपरस्टार कोण, असा प्रश्न विचारला तर बऱ्याच जणांच्या तोंडी कर्णधार विराट कोहलीचे नाव येईल. पण वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज कारयन पोलार्डला मात्र असे वाटत नाही. स्वत:मध्ये जे बदल करतात आणि आपली दखल घ्यायला लावतात, ते सुपरस्टार असतात असे पोलार्डचे म्हणणे आहे.

पोलार्डने कोहली नाही तर हार्दिक पंड्या हा भारतीय संघातील सुपरस्टार आहे, असे म्हटले आहे. पोलार्ड म्हणतो की, " हार्दिक पंड्याने स्वत:मध्ये बरेच बदल केले आहेत. त्याने आपल्या रागावर नियंत्रण मिळवले आहे. त्याचा आता आत्मविश्वास दुणावला आहे. त्याचबरोबर तो आता स्वत:वर विश्वास ठेवायला शिकला आहे. माझ्यामते हार्दिकची हीच मोठी ताकद आहे."

आयपीएलमधील मुंबई इंडियन्समधून पोलार्ड आणि हार्दिक हे एकत्र खेळतात. त्यामुळे पोलार्डला हार्दिकला जवळून पाहता आले आहे. याबाबत पोलार्डने सांगितले की, " जेव्हा मी मुंबईच्या संघाकडून खेळायला लागतो तेव्हापासून मी हार्दिकला पाहतो आहे. आता त्याच्यामध्ये बराच बदल झाला आहे. आपल्यामध्ये बरेच बदल करत तो भारताचा सुपरस्टार झाला आहे. सध्याच्या घडीला हार्दिक हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. त्याने आपले स्थान निर्माण केले आहे."

Web Title: hardik pandya is superstar of indian cricket- kieron pollard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.