Hardik Pandya 34 runs over 5 sixes: भारतीय संघाचा धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या हा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. हार्दिक काही काळ दुखापतीमुळे संघाबाहेर होता. पण नंतर त्याने आफ्रिकेविरूद्ध आपला फॉर्म दाखवून दिला. त्यानंतर आज विजय हजारे स्पर्धेत बरोडा संघाकडून खेळताना विदर्भ संघाविरूद्ध त्याने दमदार शतक ठोकले. त्याने १३३ धावांची झंझावाती खेळी केली. त्याच्या खेळीतील एका षटकांत त्याने तब्बल पाच षटकार आणि एक चौकार ठोकत ३४ धावा जमवल्या. बीसीसीआय डोमेस्टिकने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे हार्दिकच्या या खेळीची आणि त्या फटकेबाजीची क्रिकेटवर्तुळात विशेष चर्चा रंगली आहे.
बरोडा संघ २०व्या षटकांत ५ बाद ७१ धावसंख्येवर असताना हार्दिक पांड्या खेळायला आला. त्याने भाऊ कृणाल पांड्यासोबत ६५ धावांची भागीदारी केली. विदर्भकडून गोलंदाजी करणाऱ्या पार्थ रेखाडेला हार्दिकच्या फटकेबाजी चांगलाच दणका बसला. हार्दिकने त्याच्या एका षटकात पहिल्या पाच चेंडूंवर पाच षटकार खेचले. सहाव्या चेंडूवर षटकार मारून सहा चेंडूत सहा षटकार मारण्याची संधी हार्दिककडे होती. पण शेवटच्या चेंडूवर हार्दिकला चौकाराने समाधान मानावे लागले. त्यामुळे हार्दिक पांड्याला त्या षटकात तब्बल ३४ धावा मिळाल्या. पाहा व्हिडीओ-
हार्दिकच्या शतकामुळेच उभारली मोठी धावसंख्या
बरोडा संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २९३ धावा केल्या. सलामीवीर नित्या पांड्या १५ धावांवर तर अमित पस्सी शून्यावर बाद झाले. प्रियांशू मोलिया (१६), अतित शेठ (२१), कृणाल पांड्या (२३) आणि जितेश शर्मा (९) ही मधली फळीही स्वस्तात माघारी परतली. तोपर्यंत बरोडा संघ संथगतीने वाटचाल करत होता. पण हार्दिक पांड्या मैदानावर आला आणि त्याने सारा खेळच बदलून गेला. पांड्याने ६८ चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने ९२ चेंडूत ८ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने १३३ धावांची खेळी केली. त्यामुळे बरोडाने विदर्भला २९४ धावांचे लक्ष्य दिले.
Web Summary : Hardik Pandya struck a blistering century in the Vijay Hazare Trophy, smashing 34 runs in a single over with five sixes and a four against Vidarbha. His 133-run innings propelled Baroda to a strong total.
Web Summary : हार्दिक पांड्या ने विजय हजारे ट्रॉफी में तूफानी शतक जड़ा, विदर्भ के खिलाफ एक ही ओवर में पांच छक्कों और एक चौके की मदद से 34 रन बनाए। उनकी 133 रनों की पारी ने बड़ौदा को मजबूत स्कोर तक पहुंचाया।