Join us

Hardik Pandya : हार्दिक पांड्या टीम इंडियामधून होणार आऊट?; खराब कामगिरीमुळे बीसीसीआयनं घेतलाय कडक पवित्रा!  

हार्दिकनं पाकिस्तानविरुद्ध ११, न्यूझीलंडविरुद्ध २३ व ०-१७ आणि अफगाणिस्ताविरुद्ध ३५* व ०-२३ अशी कामगिरी केली.  आयपीएल २०२१नंतर हार्दिकनं दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये जाण्याएवजी मुंबई इंडियन्ससोबत राहणे पसंत केलं आणि त्यावरूनही बीसीसीआय नाराज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 16:06 IST

Open in App

BCCI unhappy with Hardik Pandya  भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशामागे एक कारण म्हणजे हार्दिक पांड्याची ( Hardik Pandya) फिटनेस... हार्दिक तंदुरुस्त नसूनही संघात निवडला गेला आणि आतापर्यंत चारही सामने खेळला. T20 World Cup मधील कामगिरीचे पोस्टमार्टम होण्यास सुरुवात झाली आहे आणि बीसीसीआयनं पहिला तिर हा हार्दिकच्या दिशेनंच ताणला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नंतर भारतीय संघ १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेसाठी मंगळवारी संघ निवड होणे अपेक्षित आहे आणि त्यात भारतीय संघातील ७-८ सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. अशात हार्दिकचे संघातील स्थान धोक्यात आल्याची चर्चा आहे. बीसीसीआयनं हार्दिकच्या निवडीवरुन नाराजी व्यक्त करताना संघ व्यवस्थापन व निवड समिती यांच्याकडे त्याच्या फिटनेसबाबतचा अहवाल मागवला आहे.

New Zealand Tour of India: भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतील अखेरच्या लढतीआधीच संपुष्टात आले.  न्यूझीलंडनं रविवारी अफगाणिस्तानचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज टीम इंडिया नामिबियाविरुद्ध औपचारिक सामना खेळणार आहे आणि मंगळवारी भारताचे सर्व खेळाडू मायदेशासाठी रवाना होतील.  मंगळवारीच टीम इंडियाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा होईल. त्यात पहिली कुऱ्हाड पडेल ती हार्दिकच्या नावावर. हार्दिकची संघातील हकालपट्टी निश्चित मानली जात आहे. आयपीएल २०२१नंतर या दुखापतग्रस्त खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्याऐवजी ( NCA)  संघात कायम का ठेवले, असा सवाल बीसीसीआयकडून केला गेला आहे. 

''हार्दिक पांड्याच्या तंदुरुस्तीवरून बीसीसीआय निवड समिती व संघ व्यस्थापनाला निश्चितच अहवाल सादर करण्यास सांगेल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSportला सांगितले. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसूनही त्याला संघात कायम ठेवले गेले आणि त्याचा फायदा कमी नुकसानच झाले. तो गोलंदाजी करत नसल्याचा फटका न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत जाणवला. बीसीसीआय या सर्व प्रकारावर प्रचंड नाराज आहे. हार्दिकसह वरुण चक्रवर्थीही पूर्णपणे तंदुरुस्त नसूनही संघात कायम राहिला. त्यामुळे आता हार्दिकला आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून डच्चू दिला जाईल आणि त्याची रवानगी NCAत होईल.   

हार्दिकनं पाकिस्तानविरुद्ध ११, न्यूझीलंडविरुद्ध २३ व ०-१७ आणि अफगाणिस्ताविरुद्ध ३५* व ०-२३ अशी कामगिरी केली.  आयपीएल २०२१नंतर हार्दिकनं दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये जाण्याएवजी मुंबई इंडियन्ससोबत राहणे पसंत केलं आणि त्यावरूनही बीसीसीआय नाराज आहे. त्यामुळे त्याला आता प्रदीर्घ काळासाठी संघाबाहेर बसवण्याचा बीसीसीआयचा इरादा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याचे पुनरागमन होऊ शकते.   

टॅग्स :हार्दिक पांड्याट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१बीसीसीआयभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App