Join us  

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणतोय..

पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी मौन बाळगलं पण अष्टपैलू...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 8:04 PM

Open in App

केपटाऊन - टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 धावांत गुंडाळण्याची करामत करून दाखविली. परंतू भारतीय फलंदाजांना विजयासाठी 208 धावांचे आव्हानही पेलवले नाही. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने 3 कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी मौन बाळगलं पण अष्टपैलू हार्दिकनं समोरच्या संघाला इशाराच दिला. 2017 मध्ये ट्विटरवर ट्विटव करणारे भारतीय खेळाडू कालच्या सामन्यानंतर शांत का? असा प्रश्न ट्विटरवर नेटीझन्सनं उपस्थित केला आहे.

मात्र आफ्रिकेतील पराभवानंतर यापैकी फक्त हार्दिक पांड्याने ट्वीट करत भारतीय संघ पुढील सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास व्यक्त केला आहे .याआधी कोणताही सामना संपल्यानंतर संघातील खेळाडू ट्वीट करत याची माहिती देत होते. मात्र पराभवानंतर टीकेचे धनी होण्यापेक्षा सोशल मीडियापासून दूर राहण्यास अनेकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

हार्दिक पांड्याने ट्विटरवरून आपल्या पाठिंब्यासाठी चाहत्यांचे धन्यवाद मानले आहेत. 'तुम्ही पहिल्या कसोटी सामन्यात ज्या शुभेच्छा आणि पाठिंबा दिला त्यासाठी मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे. पहिल्या सामन्यातील पराभामुळे आम्ही निराश झालो आहोत. आम्ही चांगली कामगिरी करूनही पराभूत झालो. दुसऱ्या कसोटीमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू', असा विश्वास पांड्याने व्यक्त केला आहे.  

 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेतील पुढील सामना 13 जानेवारी रोजी रंगणार आहे. 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८