Join us

बीसीसीआयच्या नोटिसीला हार्दिक पांड्यानं दिलं उत्तर, म्हणाला...

महिलांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या भारताच्या हार्दिक पांड्याला नेटिझन्सने चांगलेच झोडपले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 08:51 IST

Open in App
ठळक मुद्देकॉफी विथ करण 6 कार्यक्रमात हार्दिक पांड्याचं विवादास्पद विधानमहिलांचा अनादर करणाऱ्या पांड्याला नेटिझन्सने झोडपलंबीसीसीआयकडूनही कारणे दाखवा नोटीस

मुंबई : महिलांबद्दल अपमानास्पद विधान करणाऱ्या भारताच्या हार्दिक पांड्याला नेटिझन्सने चांगलेच झोडपले. कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात पांड्या आणि लोकेश राहुल यांनी नुकतीच हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या ओघात पांड्याने महिलांबद्दल विवादास्पद वाक्य केले. त्यानंतर पांड्यावरील वाढता रोष लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पांड्या व राहुल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि 24 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले. पांड्याने लगेचच बीसीसीआयच्या नोटीसीला उत्तर दिलं. त्यानं त्या विधानाबद्दल बीसीसीआयची मनापासून माफी मागितली.

कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात या दोघांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले असता हार्दिकने कुटुंबीय खुलेपणाने माझ्या सेक्स लाइफबद्दल चर्चा करतात असे उत्तर दिले. तो पुढे म्हणाला,''एकदा आई-बाबांबरोबर एका पार्टीला गेलो होतो तेव्हा तेथे उपस्थित कोणत्या मुलीबरोबर शरीर संबंध झाल्याचे त्यांनी मला विचारले. त्यावेळी मी अनेकींकडे बोट दाखवले. आपलं कौमार्य गमावल्याबद्दलही मी पालकांना अगदी कूलपणे सांगितले. मी घरी आल्यावर पालकांना ‘आज मी करुन आलो’ असंही मी सांगतो.''

पांड्याच्या या बिनधास्त वक्तव्याचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर पांड्याने बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला,''कॉफी विथ करण या कार्यक्रमातील माझ्या वक्तव्यावर कोणाची मनं दुखावली असतील, तर त्यांची माफी मागतो. मला कोणालाही दुखवायचे नव्हते.'' पण, बीसीसीआयनेही या प्रकरणाची दखल घेत पांड्यावर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आणि दोघांनाही नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना पांड्या म्हणाला की,'' हा कार्यक्रम दिलखुलास गप्पांचा होता आणि त्या ओघात मी विधान करून गेलो. त्या विधानाचं गांभीर्य मला नंतर समजलं. माझी चूकं मला उमगली आणि मी बीसीसीआयची मनापासून माफी मागतो. त्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांचीही मी माफी मागतो.'' 

टॅग्स :हार्दिक पांड्यालोकेश राहुलबीसीसीआयकॉफी विथ करण 6