Join us

Hardik Pandya-Natasa Wedding: मम्मी-पप्पांच्या लग्नात पोरगा नाचणार! हार्दिक पांड्या पुन्हा नताशाशी लग्न करतोय

हार्दिक आणि नताशा यांनी २०२० मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 20:14 IST

Open in App

टीम इंडियाचा टी २० चा कर्णधार हार्दिक पांड्या आणि त्याची कोर्ट मॅरेजवाली पत्नी नताशा स्टैनकोविच आज पुन्हा एकदा धुमधडाक्यात लग्न करणार आहेत. दोघेही उदयपूरला पोहोचले असून त्यांच्या मागोमाग केजीएफ स्टार यश आणि त्याची पत्नी, विराट-अनुष्का आणि नुकतेच लग्न झालेले जोडपे केएल राहुल आणि अथिया शेट्टी देखील पोहोचले आहेत. 

हार्दिक आणि नताशा यांनी २०२० मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. त्यांना एक मुलगा देखील आहे. त्याचे नाव अगस्त्य आहे. गंमतीची गोष्ट म्हणजे आई-बाबांच्या लग्नात नाचण्याचा आनंद त्याला अनुभवता येणार आहे. 

'KGF' सिनेमाचा स्टार यशही उदयपूरला पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. यशला उदयपूर विमानतळावर पत्नी राधिका पंडितसोबत स्पॉट करण्यात आले. तो तिथे खासगी विमानाने पोहोचला आहे. हार्दिक पांड्या पत्नी नताशा आणि मुलगा अगस्त्यसोबत सोमवारी उदयपूरला रवाना झाला होता. मोठा भाऊ कृणाल पंड्या आणि पत्नी पंखुरीही त्याच्यासोबत होते. याशिवाय नताशाचे कुटुंबही सर्बियाहून मुंबईत पोहोचले होते, ते देखील उदपूरला गेले आहेत. 

भारताचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी देखील मुंबई विमानतळावर दिसले. महत्वाचे म्हणजे विराट आणि अनुष्का विमानतळावर स्पॉट झाल्यानंतर काही वेळातच राहुल आणि अथियाही आले होते. यामुळे हे सर्व एकाच विमानाने उदयपूरला गेल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

टॅग्स :हार्दिक पांड्याविराट कोहली
Open in App