Join us

Hardik Pandya KL Rahul Funny Video, IPL 2022 GT vs LSG Live: "नाही नाही... तू हेच बोलला होतास..."; हार्दिक-राहुलमध्ये टॉसदरम्यान पिकला हशा

सामन्याआधीच दोन मित्रांमध्ये घडला मजेदार किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 21:32 IST

Open in App

Hardik Pandya KL Rahul Funny Video, IPL 2022 GT vs LSG Live: मंगळवारी गुजरात टायटन्स (GT) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात सामना रंगला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधारांमध्ये जोरदार हशा पिकला. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल हे दोघे मित्र आहेत. नाणेफेक झाल्यावर लोकेश राहुलने नाणे फेकले आणि हार्दिक पांड्याला बोलावले. हार्दिक पांड्याने हेड्स (Heads) म्हंटलं. पण केएल राहुलला वाटले की तो टेल्स (Tails) म्हणाला. त्यावरूनच हा मजेशीर प्रसंग घडला.

नाणेफेकीनंतर लोकेश राहुल म्हणाला की तू टेल्स बोलला होतास ना... त्यावर हार्दिक पांड्या म्हणाला की हेड्स बोललो. नाणेफेक जिंकल्यानंतर लगेचच हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघ गुणतालिकेत टॉप २ मध्ये आहेत. त्यामुळे आजच्या टॉसला खूप महत्त्व होतं. आज जो संघ सामना जिंकेल, तो थेट प्लेऑफमध्ये पोहोचेल. पाहा व्हिडीओ-

लखनौ सुपर जायंट्स: क्विंटन डी कॉक, लोकेश राहुल, दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, आयुष बडोनी, मार्कस स्टॉयनीस, जेसन होल्डर, करन शर्मा, दुष्मंथा चमिरा, आवेश खान, मोहसीन खान

गुजरात टाइटन्स: वृद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या, डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशिद खान, साई किशोर, अल्जारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी

टॅग्स :आयपीएल २०२२हार्दिक पांड्यालोकेश राहुलगुजरात टायटन्सलखनौ सुपर जायंट्स
Open in App