Join us  

हार्दिक पांड्या एनसीएमध्ये दाखल; इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार

Hardik Pandya: हार्दिक पांड्या ९व्या षटकात गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 10:56 AM

Open in App

हार्दिक पांड्या ९व्या षटकात गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. तिसन्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्हचा फटका पायाने आडवण्याच्या प्रयत्नात हार्दिकचा पाय मुरगळला. त्याच्या घोट्याला इजा झाली अन् तो मैदानावरच बसला. पांड्याला स्टेडियमजवळील एका खासगी रुग्णालयात नेऊन त्याच्या पायाचे स्कॅन करण्यात आले. 

स्कॅनिंगनंतर पांड्या ड्रेसिंग रूममध्ये परतला होता. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. रविवारी भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सामना होणार आहे. या सामन्याला पांड्या मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पांड्याला उपचारासाठी एनसीएमध्ये दाखल झाला आहे. पांड्यावर इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टर उपचार करतील, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे पांड्याला झालेल्या दुखापतीने सर्वांची चिंता वाढवली आहे. 

भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील विजयी घोडदौड चौथ्या सामन्यातही कायम राखली. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशला झोडून काढले. भारताने ७ विकेट्स राखून आजचा सामना जिंकला. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली व लोकेश राहुल यांनी दमदार फलंदाजी केली. विराटने षटकार खेचून वैयक्तिक शतकही पूर्ण केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तबही केले.

तत्पूर्वी, बांगलादेशचे सलामवीर तनझीद हसन ( ५१) व लिटन दास ( ६६) यांनी ९३ धावांची भागीदारी केली. पण, कुलदीप यादवने पहिला धक्का दिल्यानंतर त्यांची गाडी घसरली.  मुश्फिकर रहिम ( ३८) आणि तोवहीद हृदय ( १६) यांनी ४२ धावा जोडल्या. नसूम अहमद ( १४) व महमदुल्लाह २५ चेंडूंत ३२ धावांची भागीदारी केली. महमदुल्लाहने  ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा करून बांगलादेशला ८ बाद २५६ धावांपर्यंत पोहोचवले 

टॅग्स :हार्दिक पांड्याभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय