Hardik Pandya ex wife Natasa Stankovic: भारताचा धडाकेबाज ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या आयपीएल खेळत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला आणखी एक विजेतेपद मिळवून देण्याकडे त्याचे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे लक्ष आहे. तो क्रिकेटच्या मैदानात मनापासून खेळतोय. एकीकडे पांड्या आयपीएल खेळण्यात व्यग्र असताना त्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा काय करतेय, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याबद्दल जाणून घेऊया.
नताशाने शेअर केली इन्स्टा स्टोरी
नताशा स्टॅन्कोविक ही प्रत्यक्षात सर्बियाची आहे. पण भारतात ती तिच्या मॉडेलिंग आणि बिझनेसच्या दृष्टीने वास्तव्यास असते. हार्दिक पांड्यासोबत घटस्फोट झालयानंतर सुरुवातीला ती सर्बियाला निघून गेली होती. पण त्यानंतर अभिनेत्री, मॉडेल आणि लघुउद्योजिका म्हणून नताशा पुन्हा एकदा सक्रिय झाली. हळूहळू ती सोशल मीडियावरही अधिक सक्रिय होताना दिसतेय. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली होती. हार्दिक IPL खेळत असताना नताशा आपला मुलगा अगस्त्यसोबत छान वेळ घालवताना दिसली. नताशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहिले की, आजचा दिवसा माझ्यासाठी खास आहे. त्या फोटोमध्ये ती तिचा मुलगा अगस्त्यसोबत धमाल मस्ती करताना दिसत होती.
मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी शेअर केला फोटो
नताशाने मुलासोबतचा हा फोटो शेअर करण्याची वेळही महत्त्वाची होती. IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्या सामन्यापूर्वी तिने हा फोटो काढला. ६ मे रोजी मुंबई आणि गुजरात यांच्यात हा सामना रंगणार आहे. नताशाने अगस्त्यसोबतचा तो फोटो ५ मे रोजी इंस्टा स्टोरीवर पोस्ट केला होता.