Join us

हार्दिक पांड्याने पुन्हा लसिथ मलिंगाकडे दुर्लक्ष केलं? मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन अन् कोचमध्ये भांडण?

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हा हार्दिकचा MI कडून आयपीएलमधील शंभरावा सामना ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 16:43 IST

Open in App

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने सोमवारी आयपीएलमध्ये फ्रँचायझीकडून ऐतिहासिक टप्पा ओलांडला. राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हा हार्दिकचा MI कडून आयपीएलमधील शंभरावा सामना ठरला. रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा आणि अंबाती रायुडू यांच्यानंतर MI साठी १०० सामने खेळणारा हार्दिक सातवा खेळाडू ठरला आहे. 

या विशेष सामन्यात हार्दिकला मुंबई इंडियन्सकडून १०० क्रमांकाची जर्सी भेट देण्यात आली. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज प्रशिक्षक लसिथ मलिंगाच्या हस्ते ही जर्सी दिली गेली आणि यावेळी संघाचे सर्व सदस्यही होते. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या इनिंग्जच्या ब्रेकदरम्यान ही भेट दिली गेली. दुसऱ्या इनिंग्जच्या सुरुवातीला हार्दिक खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना मलिंगाने ही भेट दिली. त्यानंतर मलिंगाने त्याचे अभिनंदनही केले, परंतु मलिंगा त्याला मिठी मारणार तितक्यात हार्दिकने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडीओ समोर येत आहे.  

आयपीएल २०२४ मधील अशी ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही हार्दिकने गोलंदाजी प्रशिक्षकाकडे दुर्लक्ष केले आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ३१ धावांनी हार पत्करल्यानंतर मलिंगाने हार्दिकच्या बाजूला बसणे टाळले होते. याच सामन्यात हार्दिकने मलिंगाला मिठी मारणे टाळले आणि त्याने हैदराबादच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केले.  काल  राजस्थान रॉयल्सने ९ विकेट्सने हा सामना जिंकून गुणतालिकेत ८ सामन्यांत ७ विजयासह १४ गुणांसोबत अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. मुंबई इंडियन्स ८ सामन्यांत ६ गुणांसह सातव्या क्रमांकावर आहेत. आता त्यांना उर्वरित ६ सामन्यांत किमान पाच विजय मिळवावे लागणार आहेत.  

टॅग्स :आयपीएल २०२४हार्दिक पांड्यालसिथ मलिंगा