Join us

Hardik Pandya: हार्दिक पांड्या पहिल्यांदाच सासू-सासऱ्यांना भेटला; भेटीचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...

Hardik Pandya: टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पांड्याने पहिल्यांदाच नताशाच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 19:13 IST

Open in App

Hardik Pandya: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या खूप चर्चेत आहे. हार्दिकने रविवारी (25 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये जबरदस्त खेळी केली. हार्दिकने अखेरच्या सामन्यात शेवटच्या षटकात चौकार मारून भारताला सहा विकेटने विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1ने खिशात घातली.

हार्दिकने सासू-सासऱ्यांची घेतली भेटदरम्यान, हार्दिक पांड्याने ट्विटरवर एक खास व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक त्याच्या सासू आणि सासऱ्याला भेटताना दिसत आहे. हार्दिकने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, 'व्हिडिओ आणि फोन कॉलनंतर पहिल्यांदाच नॅट्सच्या (नताशा) आणि आता माझ्या कुटुंबाला भेटून छान वाटले.' नताशा स्टॅनकोविक ही मूळची सर्बियाची असून तिने सत्याग्रह या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. नंतर तिला खरी ओळख गायक बादशाहच्या 'डीजे वाले बाबू...' या सुपरहिट गाण्याने मिळाली. या गाण्यात नताशा स्टॅनकोविकने शानदार परफॉर्मन्स दिला. नताशाने बिग बॉस आणि नच बलिए यांसारख्या रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला आहे.

2020 मध्ये झाला साखरपुडानताशा अनेक सामन्यांदरम्यान हार्दिक आणि टीमला प्रोत्साहन देताना दिसली. नताशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नताशा आणि हार्दिक यांनी 2020 च्या सुरुवातीला त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर नताशाने जुलै 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. हार्दिक आणि नताशा यांनी त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य ठेवले आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याऑफ द फिल्ड
Open in App