Join us

हार्दिक पांड्यानं 16 भाषेत गोंदवलं नाव, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार घेतलेला हार्दिक पांड्या सध्या विश्रांती करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 19:25 IST

Open in App

मुंबई : दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार घेतलेला हार्दिक पांड्या सध्या विश्रांती करत आहे.  भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू पांड्यानं शुक्रवारी सर्वांना सप्राईज दिलं. मैदानावरील कामगिरीने नव्हे तर यावेळी वेगळ्या शैलीत त्यानं सर्वांना आश्चर्यचकीत केले. त्याने आपल्या शरीरावर 16 भाषेत आपलं नाव गोंदवलं आहे आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. 

पण, याही वेळेला चाहत्यांनी पांड्याची फिरकी घेण्याचा मोह आवरलेला नाही. त्यांनी पांड्याच्या टॅटूवर जोक्स करण्यास सुरूवात केली आहे. पांड्याच्या डाव्या खांद्यावर 'Believe' असं लिहिलेल टॅटू आधीच होता. तसेच “Never Give Up” असाही टॅटू त्याच्या हातावर आहे. पण, आता त्यानं स्वतःचं नाव 16 भाषेत गोंदवून घेतले आहेत.  

 

टॅग्स :हार्दिक पांड्याबीसीसीआय