Join us
Daily Top 2Weekly Top 5

निलंबनानंतर पहिल्यांदाच दिसला हार्दिक पंड्या

पंड्या मुंबईला येऊन कुणाची भेट घेणार, याची उत्सुकता असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 17:05 IST

Open in App

मुंबई : 'कॉफी विथ करण- 6' या कार्यक्रमातील हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलच्या विधानांची बीसीसीआयकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. बीसीसीआयने पंड्या आणि राहुल या दोघांचेही निलंबन केले आहे. या निलंबनाच्या कारवाईनंतर पंड्या पहिल्यांच सार्वजनिक ठिकाणी पाहिला गेला.

निलंबनाची कारवाई झाल्यावर पंड्याने स्वत:ला एका रुममध्ये कोंढून घेतले होते. घरी कुठल्याही व्यक्तीबरोबर तो संवाद साधत नव्हता. पण आज मात्र पंड्या या निलंबनानंतर पहिल्यांदा बाहेर पडला. यावेळी हार्दिकबरोबर त्याचा भाऊ कृणालही होता.

पंड्या आणि राहुल जे काही बोलले ते भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र गंभीर असल्याचे वाटत नाही. याबाबत कोहली म्हणाला की, " पंड्या आणि राहुल हे दोघेही भारतीय संघाचे सदस्य आहे. त्याचबरोबर ते एक जबाबदार क्रिकेटपटू आहेत. पण त्यांनी जे मत व्यक्त केले आहे, त्याच्या संघाशी किंवा त्यांच्या खेळाशी काहीही संबंध नाही. कारण ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. या त्यांच्या मताशी आमचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे या त्यांच्या वक्तव्याचा संघावर किंवा आमच्या कामगिरीवर काहीही परीणाम होणार नाही. आता आम्ही फक्त याबाबत पुढे नेमके काय होते, यावर लक्ष ठेवून आहोत. "

शनिवारी हार्दिक आणि कृणाल यांना मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाहिले गेले. यावेळी हार्दिकच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला होता, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आता पंड्या मुंबईला येऊन कुणाची भेट घेणार, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

टॅग्स :हार्दिक पांड्याकॉफी विथ करण 6