Hardik Pandya vs Kane Williamson, IPL2022 SRH vs GT Live: गुजरातचा विजयरथ हैदराबादने रोखला! केन विल्यमसनने ठोकलं शानदार अर्धशतक

दोनही कर्णधारांची अर्धशतके, पण हैदराबाद ठरलं गुजरापेक्षा वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 11:41 PM2022-04-11T23:41:46+5:302022-04-11T23:42:36+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya Fifty in vain as Kane Williamson Fifty takes Sunrisers Hyderabad win over Gujarat Titans IPL 2022 GT vs SRH | Hardik Pandya vs Kane Williamson, IPL2022 SRH vs GT Live: गुजरातचा विजयरथ हैदराबादने रोखला! केन विल्यमसनने ठोकलं शानदार अर्धशतक

Hardik Pandya vs Kane Williamson, IPL2022 SRH vs GT Live: गुजरातचा विजयरथ हैदराबादने रोखला! केन विल्यमसनने ठोकलं शानदार अर्धशतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya vs Kane Williamson, IPL2022 SRH vs GT Live: गुजरात टायटन्सने सलामीचे तीन जिंकून दमदार सुरूवात केल्यानंतर अखेर आज त्यांचा विजयरथ सनराजयर्स हैदराबादने रोखला. हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातच्या संघाने १६२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार केन विल्यमसननेही अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दोन्ही कर्णधारांनी अर्धशतके केली असली तरी हैदराबादचा संघ गुजरातपेक्षा वरचढ ठरला.

केन विल्यमसनने टॉस जिंकून गुजरातला फलंदाजी दिली. गुजरातचे सलामीवीर शुबमन गिल आणि मॅथ्यू वेड स्वस्तात बाद झाले. गिल ७ धावांवर आणि वेड १७ धावांवर माघारी परतला. नवखा साई सुदर्शनदेखील ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर डेव्हिड मिलरही १२ धावा काढून बाद झाला. पण हार्दिकने एक बाजू लावून धरली. त्याने ४२ चेंडूत संयमी नाबाद ५० धावांची खेळी केली. अभिनव मनोहरने फटकेबाजी करत शेवटच्या टप्प्यात २१ चेंडूत ३५ धावा केल्या.

प्रत्युत्तरात हैदराबादचे सलामीवीर केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांनी अप्रतिम सुरूवात केली. अभिषेक शर्मा ४२ धावांवर बाद झाला. पण विल्यमसनने मात्र दमदार अर्धशतक ठोकले. तो ४६ चेंडूत ५७ धावा काढून बाद झाला. त्याआधी राहुल त्रिपाठीने धावगती वाढवली. ११ चेंडूत १७ धावांवर असताना तो दुखापतग्रस्त होऊन माघारी परतला. तर अखेरीस निकोलस पूरनने १८ चेंडूत नाबाद ३४ धावा काढत संघाला विजय मिळवून दिला.

Web Title: Hardik Pandya Fifty in vain as Kane Williamson Fifty takes Sunrisers Hyderabad win over Gujarat Titans IPL 2022 GT vs SRH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.