Hardik Pandya: भर मैदानात हार्दिकनं गर्लफ्रेंड माहिकासाठी असं काही केलं की...; रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद!

Hardik Pandya Viral Video: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हार्दिक पांड्याचा मैदानातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:04 IST2026-02-27T16:03:29+5:302026-02-27T16:04:30+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya could not hold back! Blows Flying Kiss to girlfriend Mahika Sharma after smashing 23-ball fifty; Video goes viral | Hardik Pandya: भर मैदानात हार्दिकनं गर्लफ्रेंड माहिकासाठी असं काही केलं की...; रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद!

Hardik Pandya: भर मैदानात हार्दिकनं गर्लफ्रेंड माहिकासाठी असं काही केलं की...; रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद!

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीतील अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ७२ धावांनी धुव्वा उडवला. गुरुवारी (२६ फेब्रुवारी) चेन्नईच्या मैदानावर रंगलेल्या या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवत उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले. या सामन्यात हार्दिक पंड्या आपल्या जुन्या फॉर्मात परतलेला दिसला. भारताच्या डावातील शेवटच्या चेंडूत त्याने अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर स्टँड्समध्ये बसलेली त्याची गर्लफ्रेन्ड माहिका शर्माला फ्लाइंग किस दिले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताची धावसंख्या २५० पलिकडे नेण्यात हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिकने अवघ्या २३ चेंडूत नाबाद ५० धावा केल्या, ज्यात ४ चौकार आणि २ चौकारांचा समावेश आहे. हार्दिकची ही खेळी पाहून स्टँड्समध्ये बसलेली त्याची गर्लफ्रेन्ड माहिका शर्मा आनंदाने उड्या मारल्या. तसेच टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. यावेळी हार्दिकनेही तिला फ्लाइंग किस दिले. या दोघांमधील हा रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात अभिषेक आणि संजू सॅमसनने पहिल्या विकेटसाठी ४८ धावा जोडून पाया रचला, तर मधल्या फळीत इशान किशन (३८ धावा) आणि सूर्यकुमार यादव (३३ धावा) यांनी धावगती कायम ठेवली. मात्र, शेवटच्या षटकांत हार्दिक आणि तिलक वर्मा यांनी केवळ ३१ चेंडूत ८४ धावांची अभेद्य भागीदारी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. भारताने हा सामना जिंकून सेमीफायनलच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या.

हार्दिक पांड्याची टी-२० विश्वचषकातील कामगिरी

तारीखविरुद्ध संघधावा आणि विकेट
२६ फेब्रुवारी २०२६झिम्बाब्वे५० धावा आणि शून्य विकेट
२२ फेब्रुवारी २०२६द. आफ्रिका१८ धावा आणि शून्य विकेट
१८ फेब्रुवारी २०२६नेदरलँड्स३० धावा आणि १ विकेट
१५ फेब्रुवारी २०२६पाकिस्तानशून्य धाव आणि २ विकेट्स
१२ फेब्रुवारी २०२६नामिबिया५२ धावा आणि २ विकेट्स
७ फेब्रुवारी २०२६अमेरिका५ धावा आणि शून्य विकेट

Web Title : टी20 वर्ल्ड कप मैच के बाद हार्दिक का गर्लफ्रेंड के लिए इशारा वायरल।

Web Summary : जिम्बाब्वे के खिलाफ टी20 विश्व कप में हार्दिक पांड्या के अर्धशतक का जश्न गर्लफ्रेंड माहिका शर्मा ने मनाया। पांड्या ने उन्हें फ्लाइंग किस दिया, और रोमांटिक पल वायरल हो गया। भारत ने सेमीफाइनल की उम्मीद जिंदा रखते हुए मैच जीत लिया।

Web Title : Hardik's gesture for girlfriend goes viral after T20 World Cup match.

Web Summary : Hardik Pandya's fifty against Zimbabwe in the T20 World Cup was celebrated by girlfriend Mahika Sharma. Pandya blew a kiss to her, and the romantic moment went viral. India won the match, keeping semi-final hopes alive.