हार्दिक पांड्यानं दिली प्रेमाची जाहीर कबुली; इंस्टाग्रामवर लव्ह बर्डचा लपंडाव

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं रविवारी इंस्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 12:09 IST2019-09-23T12:07:25+5:302019-09-23T12:09:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya confirms relationship with Natasa Stankovic, love bird cought on Instagram | हार्दिक पांड्यानं दिली प्रेमाची जाहीर कबुली; इंस्टाग्रामवर लव्ह बर्डचा लपंडाव

हार्दिक पांड्यानं दिली प्रेमाची जाहीर कबुली; इंस्टाग्रामवर लव्ह बर्डचा लपंडाव

मुंबई : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं रविवारी इंस्टाग्रामवर प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे, त्यात आणखी एकीची भर पडली आहे. या अभिनेत्रीसोबतचं नातं इतकं सीरियस आहे की हार्दिकनं चक्क घरच्यांशी तिची ओळख करून दिली होती. रविवारी या दोघांनी प्रेम कबुल केले. इंस्टाग्रामवर या लव्ह बर्डचा लपंडाव, नेटिझन्सने पकडला. 

नताशा स्टॅनकोव्हिक असे या अभिनेत्रीचे नाव आहे. हार्दिक नताशाला डेट करत असल्याचीही चर्चा होती. काही दिवसांपूर्वी हार्दिक नताशासोबत वांद्रे येथे दिसला होता. त्याच्या मित्रांनी आयोजित केलेल्या पार्टीत तो नताशाला घेऊन आला होता. नताशासोबतच्या नात्याबद्दल हार्दिक अधिक गंभीर आहे आणि त्यानं पार्टीत तिची ओळख कुटुंबियांशी करू दिली. या पार्टीत हार्दिकचा भाऊ कृणाल आणि वहिनी पंखुडी शर्मा उपस्थित होते. या पार्टीत हार्दिकनं नताशाची ओळख त्याचा गर्लफ्रेंड म्हणून सर्वांशी करून दिली. 

मुळची सर्बियाची असलेल्या नताशाने वयाच्या तिसऱ्या वर्षीय डान्स शिकायला सुरुवात केली. 2010मध्ये स्पोर्ट्स सर्बिया या किताब जिंकल्यानंतर तिनं स्पोर्ट्समध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. तिने नच बलिए 9 सीजनमध्ये सहभाग घेतला होता. एली गोनी आणि प्रियांक शर्मा यांच्याशीही नताशाचे नाव जोडले गेले आहे. यापूर्वी हार्दिकचे नाव इशा गुप्ता, अॅली अव्हराम आणि उर्वशी रौलेताशी जोडले गेले आहे.

पण, हार्दिकनं रविवारी शेअर केलेल्या फोटोत मी प्रेमात पडलोय, अशी पोस्ट लिहिली. त्यावर नताशानं त्वरित तुझ्याच प्रेमात असे उत्तर दिले.
पाहा फोटो...

Web Title: Hardik Pandya confirms relationship with Natasa Stankovic, love bird cought on Instagram