Join us  

जगातल्या कोणत्याही मैदानावर चौकार-षटकार मारू शकतो हार्दिक पांड्या : रवी शास्त्री

हार्दिक पंड्याला इंदोर वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्याचा कोच रवी शास्त्री यांचा निर्णय मास्ट्ररस्ट्रोक ठरला आहे. बडोद्याचा हा अष्टपैलू खेळाडू जगातील कोणत्याही मैदानात चौकार आणि षटकार ठोकू शकतो, असं रवी शास्त्री म्हणाले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2017 4:01 PM

Open in App

इंदोर - हार्दिक पंड्याला इंदोर वनडेत चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्याचा कोच रवी शास्त्री यांचा निर्णय मास्ट्ररस्ट्रोक ठरला. बडोद्याचा हा अष्टपैलू खेळाडू  जगातील कोणत्याही मैदानात चौकार आणि षटकार ठोकू शकतो, असं रवी शास्त्री म्हणाले. 

हार्दिक पांड्या हा स्फोटक खेळाडू आहे. फिरकीविरोधात तो अधिक आक्रमक खेळतो. फिरकीविरोधात खेळणारा त्याच्यासारखा खेळाडू अजून पाहिला नाही. युवराज सिंह त्याच्या सुरुवातीच्या काळात असाच आक्रमक होता. हे दोघं जगातील कोणत्याही मैदानावर चौकार आणि षटकार ठोकू शकतात, असं रवी शास्त्री म्हणाले.

रवी शास्त्री यांच्या सांगण्यावरुनच पंड्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पाठवण्यात आलं होतं.  अखेरच्या सामन्यात आम्ही सर्वोत्तम फलंदाजी केली, ती खेळपट्टी सोपी नव्हती पण हिटमॅन रोहीत शर्माच्या फटकेबाजीमुळे लक्ष्य सोपं झालं असं शास्त्री पुढे म्हणाले.

भारत वनडेत पुन्हा अव्वल;नागपुरात कांगारुंना चारली धूळ- 

सलामीवीर रोहित शर्माने चौकार-षटकारांची आतिषबाजी करीत कारकीर्दीत १४ व्या शानदार शतकाची नोंद केली. सहा हजार धावांचा टप्पा गाठणा-या रोहितला अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकी खेळीची साथ मिळताच भारतीय संघाने पाचव्या आणि अखेरच्या वन डेत रविवारी सात गड्यांनी विजय साजरा करीत आॅस्ट्रेलियावर ४-१ असा मालिका विजय नोंदविला.विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित स्टेडियमवर प्रथम फलंदाजी घेणाºया आॅस्ट्रेलियाला ५० षटकांत ९ बाद २४२ धावांत रोखून धरल्यानंतर २४३ धावांचे विजयी लक्ष्य ४२.५ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गााठले. रोहितने १०४ चेंडूत ११ चौकार आणि पाच षटकारांसह १२५ धावांचे योगदान दिले. रोहित-अजिंक्य यांनी २२.३ षटकांत १२४ धावांची सलामी दिल्यानंतर रोहितने कर्णधारविराट कोहलीसह दुस-या गड्यासाठी १६.४ षटकांत ९९ धावा कुटल्या. रोहित पाठोपाठ विराट(३९ धावा) बाद झाला. रहाणेने ६१ धावांचे योगदान दिले. केदार जाधव(५)आणि मनीष पांडे(११)यांनी नाबादद राहून विजयावर शिक्कामोर्तब केले.२००९ मध्ये ९९ धावांनी आणि २०१३ मध्ये सहा गड्यांनी विजय नोंदविणाºया भारताचा व्हीसीएवर आॅस्ट्रेलियाविरुद्ध हा सलग तिसरा विजय ठरताच विजयाची ‘हॅट्ट्रिक’ही पूर्ण झााली.सलग तीन सामने जिंकून विजयी आघाडी घेतलेल्या भारताने बंगळुरु येथे चौथ्या सामन्यात राखीव खेळाडूंना संधी दिली. मात्र, यजमानांना २१ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, यामुळे संघाची सलग ९ सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली होती. त्यातून बोध घेत आज कुठलीही जोखिम न पत्करता भारतीय संघ विजयासाठीच खेळला व यशस्वी झाला.‘लोकल बॉय’उमेशची संधी हुकली...नागपूरकरांची नजर स्थानिक खेळाडू उमेश यादववर केंद्रित झाली होती. राष्टÑगीताच्यावेळी उमेश सहकाºयांसोबत मैदानात आल्याने तो पहिल्यांदा जामठा येथे खेळेल, असा अनेकांचा समज झाला होता; पण त्याला आजही संधी मिळू शकली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडणाºया उमेशला नागपुरात आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही.रोहित शर्माच्या सहा हजार धावारोहितने आज १६८ व्या सामन्यात सहा हजार धावांचा पल्ला गााठला. ३३ व्या षटकांत कमिन्सच्या पाचव्या चेंडूवर रोहितने एक धाव घेत ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो नववा भारतीय खेळाडू बनला आहे.पहिल्या दहा चेंडूंवर खातेही न उघडू शकलेल्या रोहितने स्वत:चे अर्धशतक मात्र ५२ चेंडूत सात चौकार आणि एका षटकारासह पूर्ण केल्यानंतर ३५ व्या षटकांत कूल्टर नाईलच्या अखेरच्या चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने षटकार खेचून रोहितने ९४ चेंडूत दहा चाौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने कारकीर्दीतील १४ वे शतकही गााठले. नंतर पुन्हा षटकार खेचून ३७ व्या षटकाअखेर संघाच्या २०० धावा फळ्यावर लावल्या.रहाणेचे सलग चौथे अर्धशतकअजिंक्य रहाणेने देखील रोहित पाठोपाठ अर्धशतक गाठले. फॉल्कनरला २० व्या षटकांत अखरच्या चेंडूूवर सुरेख चौकार ठोकून मालिकेत सलग चौथे शतक साजरे केले. ६४ चेंडूत सहा चौकारांसह अर्धशतकी खेळी करणाºया अजिंक्यने शैलीदार फटकेबाजीचा परिचय देत खेळीदरम्यान चाहत्यांची टाळ्यांनी दाद मिळविली. ६१ धावा काढल्यानंतर कूल्टर नाईलच्या चेंडूवर तो पायचित झााला. त्याआधी, सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ६२ चेंडूत पाच चौकारांसह सर्वाधिक ५३ धावांचे योगदान दिले. मार्क्स स्टोयनिस आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पाचव्या गड्यासाठी सर्वााधिक ८७ धावांची भागीदारी केली. स्टोयनिसने ४६ तसेच हेडने ४२ धावा केल्या. कर्णधार स्मिथ केवळ १६ धावा काढून बाद होताच मधली फळी धावा काढण्यात पुन्हा अपयशी ठरली.आॅस्ट्रेलियाची सुरुवात दणक्यात झाली. मात्र सलामीवीर अ‍ॅरोन फिंचची (३२) विकेट काढून भारताने आॅस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंच बाद झाल्यावर स्टिव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पीटर हॅन्डस्कोम्बही बाद होताच मधल्या फळीला खिंडार पडले. आॅस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर स्टोयनिस- हेड यांनी काही वेळ भारतीय माºयाचा प्रतिकार केला. ४५ व्या षटकानंतर सहा बाद २११ अशी स्थिती झााली होती. डेथ ओव्हरमध्ये मॅथ्यू वेड, फॉल्कनर, कूल्टर नाईल आणि कमिन्स यांना धावसंख्येला आकार देण्यात अपयश आले. स्पिनर अक्षर पटेलने ३८ धावांत तीन आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ५१ धावांत दोन गडी बाद केले.भारत-आॅस्ट्रेलिया सामन्यासाठी कार आणि अन्य चारचाकी वाहने घेऊन आलेल्या प्रेक्षकांना जामठा परिसरात तीन किलोमीटर आधीच रोखण्यात आले होते. स्टेडियमपासून पुढे तीन किमी अंतरावर असलेल्या नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या आतील मैदानावर चारचाकींचे पार्किंग असल्यामुळे वाहन पार्क केल्यानंतर पायपीट करीत स्टेडियम गाठावे लागले.चाहत्यांच्या उत्साहाला उधाणभारताने माालिकेचा आधीच निकाल लावला असला तरी पाचव्या आणि अखेरच्या वन डेला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. रविवार असल्याने शाळकरी मुले, कॉलेजियन्स आणि कुटंबातील मंडळींचा गर्दीत समाावेश होता. टीम इंडियाचे टी शर्ट घाालून येण्यास अनेकांनी प्राधान्य दिले होते. उकाडा आणि कडक उन्हाची पर्वा न करता घामाघूम होत दीड तास आधीच मैदान गाठल्याने सामना सुरू होण्याआधी स्टेडियम फुल्ल झाले.पत्रकारांनाही फटकायाचा फटका पत्रकारांनाही बसला. वृत्ताकंनासाठी कार घेऊन आलेल्या पत्रकारांना स्टेडियम गाठण्यासाठी जवळपास ४ किमी अंतर पायी चालत जावे लागले.धावफलकआॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. मनीष पांडे गो. पटेल ५३, अ‍ॅरोन फिंच झे. बुमराह गो. पांड्या ३२, स्टीव्ह स्मिथ पायचीत गो. जाधव १६, पीटर हॅन्डस्कोम्ब झे. रहाणे गो. पटेल १३, ट्रेव्हिस हेड त्रि. गो. पटेल ४२, मार्क्स स्टोयनिस पायचीत गो. बुमराह ४६, मॅथ्यू वेड झे. रहाणे गो. बुमराह २०, जेम्स फॉल्कनर धावबाद १२, पॅय कमिन्स नाबाद २, नॉथन कूल्टर नाईल त्रि. गो. भुवनेश्वर ०; अवांतर : ६; एकूण : ५० षटकांत ९ बाद २४२; गडी बाद होण्याचा क्रम : १/६६, २/१००, ३/११२, ४/११८, ५/२०५, ६/२१०, ७/२३७, ८/२४२, ९/२४२; गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ०८-००-४०-०१, जसप्रीत बुमराह १०-०२-५१-०२, हार्दिक पांड्या ०२-००-१४-०१, कुलदीप यादव १०-०१-४८-००, केदार जाधव १०-००-४८-०१, अक्षर पटेल १०-००-३८-०३.भारत :- अजिंक्य रहाणे पायचित गो. कुल्टर नाईल ६१, रोहित शर्मा झे. कुल्टर नाईल गो. झम्पा १२५, विराट कोहली झे. स्टोइनिस गो. झम्पा ३९, केदार जाधव नाबाद ०५, मनीष पांडे नाबाद ११. अवांतर (२). एकूण ४२.५ षटकांत ३ बाद २४३. बाद क्रम : १-१२४, २-२२३, ३-२२७. गोलंदाजी : पॅट कमिन्स ७-१-२९-०, नॅथन कुल्टर नाईल ९-०-४२-१, मार्कस् स्टोइनिस ४-०-२०-०, जेम्स फॉकनर ५.५-०-३७-०, अ‍ॅडम झम्पा ८-०-५९-२, ट्रॅव्हिस हेड ६-०-३८-०, अ‍ॅरोन फिंच ३-०-१७-०.

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ