Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या Ferrari तून माहिकासोबत राइड; पांड्याच्या कलेक्शनमधील सर्वात महागड्या कारची किंमत किती?

हार्दिक पांड्याच्या नव्या सुपर कारची किंमत आणि त्याची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 18:11 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाने नुकताच टी २० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकत इतिहास रचला. सलग दोन वेळा टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावल्यापासून हार्दिक पांड्या सातत्याने चर्चेत आहे. आता तो गर्लफ्रेंड माहिकासोबत नव्या कोऱ्या अलिशान कारमधून फिरतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्याने जी नवी कार घेतली आहे ती त्याच्या आतापर्यंतच्या कलेक्शनमधील सर्वात महागडी कार आहे. पांड्याने आपल्या कलेक्शमध्ये कोणत्या नव्या कारची भर घातली? या कारची किंमत किती? जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गर्लफ्रेंडसोबत नव्या कोऱ्या कारमधून फिरताना  स्पॉट झाला पांड्या

क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडत हार्दिक पांड्या हा तगडी कमाई करणाऱ्या क्रिकेटरपैकी एक आहे. मैदानातील कामगिरीशिवाय तो सातत्याने महागड्या जीवनशैलीमुळेही चर्चेत असतो. भारताचा ऑलराउंडरचा जो नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात तो गर्लफ्रेंड माहिका शर्मासह Ferrari 12Cilindri या अलिशान कारमधून फिरताना स्पॉट झाला. 

हार्दिक पांड्याच्या नव्या सुपर कारची किंमत आणि त्याची खासियत

Ferrari 12Cilindri ही आयकॉनिक इटालियन निर्माता Ferrari कंपनीची नवीनतम मॉडेल्सपैकी एक आहे. ही ग्रँड टूरर कार नॅचरल्ली अस्पिरेटेड V12 इंजिनने सुसज्ज असून ती ८०० हून अधिक हॉर्सपॉवर निर्माण करू शकते. तसेच ही कार सुमारे 340 किमी/ताशी वेग गाठण्याची क्षमता ठेवते. या कारची किंमत जवळपास १२ कोटी रुपये इतकी आहे.

क्रिकेटरचे कार कलेक्शन

Ferrari 12Cilindri हार्दिकच्या गॅरेजमधील नवी आणि सर्वात महागडी सुपर कार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मुलगा अगस्त्या अन् एक्स वाइफ नताशा यांना ४ कोटी रुपयांची कार गिफ्ट केली होती. आता तो आणखी एका नव्या कारचा मालक झाला आहे.  

  • रोल्स-रॉइस फॅन्टम (Rolls-Royce Phantom)  किंमत १.९ कोटी रुपये
  • ऑडी ए6 (Audi A6) किंमत ५ कोटी
  • रेंज रोव्हर व्होग (Range Rover Vogue) किंमत ४ कोटी
  • लॅम्बोर्गिनी उरुस एसई (Lamborghini Urus SE) किंमत ३.५४ कोटी
  • मर्सिडीज-बेन्झ (Mercedes-Benz) किंमत २.२८ कोटी
English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Pandya's Ferrari Ride with GirlFriend: Price of the New Car?

Web Summary : Hardik Pandya, fresh off a World Cup win, spotted with girlfriend in a new Ferrari 12Cilindri. This luxurious car boasts a V12 engine, exceeding 800 horsepower, and costs approximately ₹12 crore, the priciest in his collection.
टॅग्स :हार्दिक पांड्याऑफ द फिल्ड