हार्दिक पांड्याने 'त्या' धक्कादायक विधानाबद्दल मागितली माफी

'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सत्रात भारतीय क्रिकेट संघातील हॉट बॉय हार्दिक पंड्याने विवादास्पद विधान केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 10:34 IST2019-01-09T10:33:22+5:302019-01-09T10:34:50+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Hardik Pandya apologises after his comments on Koffee with Karan | हार्दिक पांड्याने 'त्या' धक्कादायक विधानाबद्दल मागितली माफी

हार्दिक पांड्याने 'त्या' धक्कादायक विधानाबद्दल मागितली माफी

ठळक मुद्देकॉफी विथ करण कार्यक्रमात हार्दिक पांड्या व लोकेश राहुलची हजेरीहार्दिक पांड्याने सेक्शुअल लाईफबद्दल केले विधान

मुंबई : 'कॉफी विथ करण'च्या सहाव्या सत्रात भारतीय क्रिकेट संघातील हॉट बॉय हार्दिक पंड्याने विवादास्पद विधान केले होते. नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतल्यानंतर पांड्याने अखेरीत माफी मागितली. के. एल. राहुल आणि  पांड्या यांनी नुकतीच प्रसिद्ध कॉफी विथ करण या शोवर हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात या दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यातच पांड्याने महिलांबद्दल धक्कादायक विधान केले होते.

करणने या दोघांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले असता हार्दिकने कुटुंबीय खुलेपणाने माझ्या सेक्स लाइफबद्दल चर्चा करतात असे उत्तर दिले. तो पुढे म्हणाला,''एकदा आई-बाबांबरोबर एका पार्टीला गेलो होतो तेव्हा तेथे उपस्थित कोणत्या मुलीबरोबर शरीर संबंध झाल्याचे त्यांनी मला विचारले. त्यावेळी मी अनेकींकडे बोट दाखवले.  आपलं कौमार्य गमावल्याबद्दलही मी पालकांना अगदी कूलपणे सांगितले. मी घरी आल्यावर पालकांना ‘आज मी करुन आलो’ असंही मी सांगतो.''



पांड्याच्या या बिनधास्त वक्तव्याचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर पांड्याने बुधवारी इस्टाग्रामवरून सर्वांची माफी मागितली. तो म्हणाला,''कॉफी विथ करण या कार्यक्रमातील माझ्या वक्तव्यावर कोणाची मनं दुखावली असतील, तर त्यांची माफी मागतो. मला कोणालाही दुखवायचे नव्हते.''

 

Web Title: Hardik Pandya apologises after his comments on Koffee with Karan