मुंबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. ही गोष्ट त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीरही केली. पण या गोष्टीनंतर हार्दिक आणि नताशा यांच्यावर काही जणं टीकाही करताना दिसत आहेत. सध्या बॉलीवूडचा एक अभिनेता आणि निर्माता असलेल्या एका व्यक्ती भयंकर टीका करत या दोघांना ट्रोल केले आहे. या साखरपुड्याची माहिती हार्दिकच्या घरच्यांनाही नव्हती. याबाबतचा मोठा खुलासा हार्दिकच्या वडिलांनीच आता केला होता.
![]()
भारताचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा प्रेमाच्या मैदानात त्रिफळा उडाला. नववर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिकने सर्बियन गर्लफ्रेंड नताशा स्टेंकोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली आहे. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे.
![]()
हार्दिक आणि नताशा यांचे साखरपुड्यानंतरचे काही फोटो चांगलेच वायरल झाले. वायरल झालेल्या एका फोटोबरोबर काही ट्रीक करून या दोघांना ट्रोल केल्याचे दिसत आहे. या दोघांचा एक फोटो घेऊन त्याच्यावरील प्रकाश कमी-जास्त करून ही टीका करण्यात आलेली आहे.
बॉलीवूडमध्ये अभिनेता आणि निर्माता असलेल्या रशिद खानने आपल्या ट्विटरला या दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली त्याने म्हटले आहे की, " या फोटोमधील ब्राइटनेस वाढवला तर नताशा दिसत नाही आणि जर कमी केला तर हार्दिक दिसत नाही."
![Hardik Pandya trolled by Kamaal Rahid Khan, I can’t understand, what to do? | हार्दिक पंड्या पर बॉलीवुड एक्टर की आपत्तिजनक टिप्पणी, कहा- ब्राइटनेस बढ़ाएं तो भाभी गायब, घटाएं तो...]()
हार्दिक आणि नताशा यांच्यावर बऱ्याच टीका झाल्या, पण रशिद खान यांनी केलेली टीका भयंकर आहे. कारण त्याच्या टीकेमधून वर्णभेद दिसून येत आहे. सरतेशेवटी हार्दिक आणि नताशा यांनी नेमके काय करावे, हा त्यांचचा प्रश्न आहे. पण रशिदने यामध्ये जाणून बुजून उडी घेतल्याचे दिसत आहे.
![]()
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी दुबईमध्ये साखरपुडा केला. त्यावेळी त्यांचे काही निकटवर्तीय सोबत होते. त्यानंतर हार्दिकने नताशा स्टेंकोविकसोबतची तीन छायाचित्रे आणि एक व्हिडिओ क्लिप इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यातील एका फोटोमध्ये नताशा साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे.
![]()
Web Title: hardik pandya and natasa stankovic utterly criticized by Bollywood actor, saying ...
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.