Join us  

हार्दीक पांड्याची पत्नी नताशा सोबत Mini Swimming Pool मध्ये फुल मस्ती, PHOTO व्हायरल 

हे सेलिब्रिटी कपल आपल्या मुलासोबत घरातच असलेल्या मिनी स्विमिंग पूल (Mini Swimming Pool) मध्ये मस्ती करता दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2021 10:17 AM

Open in App

नवी दिल्ली - टीम इंडियाचा ऑलराउंडर क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) सध्या आपला मुलगा अगस्त्य (Agastya) सोबत वेळ घालवत आहेत. नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते आणि तिने इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे सेलिब्रिटी कपल आपल्या मुलासोबत घरातच असलेल्या मिनी स्विमिंग पूल (Mini Swimming Pool) मध्ये मस्ती करता दिसत आहे.

'पांड्या फॅमिली झाली 'वॉटर बेबीज' -नताशा स्टेनकोविकने शेअर केलेल्या या फोटोला कॅप्शन देताना, 'वॉटर बेबीज', असे लिहिले आहे. हा फोटो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर लाइक आणि शेअर केला जात आहे. एका यूझरने तर, हा आजचा इंटरनेटवरील सर्वात क्यूट फोटो आहे, असे लिहिले आहे.

हार्दिक-नताशा प्रसिद्ध कपल -क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक हे अत्यंत प्रसिद्ध कपल आहे. नताशा, सातत्याने आपल्या चाहत्यांसाठी आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओज सोशल मिडियावर शेअर करत असते. नताशा मुळची यूरोपियन देश सर्बियाची नागरिक आहे. ती पेशाने बॉलीवुड अॅक्ट्रेस आणि मॉडेल आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रिकेट सट्टेबाजीनताशा स्टँकोव्हिचभारतीय क्रिकेट संघ