आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

वर्षभर दोघांच्यात सुरु होता प्रेमाचा 'लपंडाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 20:10 IST2025-07-19T19:53:29+5:302025-07-19T20:10:16+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya And Jasmin Walia Spark Breakup Rumours After Unfollowing Each Other On Instagram | आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya And Jasmin Walia Spark Breakup Rumours  : भारताचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या हा क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे सातत्याने चर्चेत असतो. एकदा नव्हे तर दोनदा जिच्यासोबत लग्न केलं त्या नताशा स्टँकोव्हिचसोबतचा संसार मोडल्यावर हा क्रिकेटर ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया हिच्या प्रेमात पडल्याची चर्चा रंगली होती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

...अन् दोघांचं सूत जुळल्याची रंगू लागली चर्चा

हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांच्यात 'जिथं तू तिथं मी..' असं दृश्य पाहायला मिळालं अन् दोघांच्यातील प्रेमाची सेटिंग अन् डेटिंगची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. पण आता ही जोडी फुटल्याची गोष्ट चर्चेत आलीये. नात्याची पुष्टी होण्याआधीच जोडीला ब्रेकअपचा टॅग लागलाय. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर स्टोरी  

सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा

वर्षभर दोघांच्यात सुरु होता प्रेमाचा 'लपंडाव'

Jasmin Walia
Jasmin Walia

हार्दिक आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाल्यावर जास्मिन पिक्चरमध्ये आली होती. हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ग्रीसमधील भटकंतीचे खास फोटो शेअर केले होते. दोघे एका फ्रेममध्ये दिसले नसले तरी फोटोतील ठिकाण एकच असल्यामुळे दोघांच्यात प्रेम फुलत असल्याची गोष्ट चर्चेत आली. IPL दरम्यान जिथं तू तिथं मी... अशा तोऱ्यात  जास्मीन MI चा कॅप्टन हार्दिक पांड्याला चीअर करताना दिसली होती. 

दोघांनी एकमेकांना केलं अनफॉलो

सातत्याने एकमेकांना फॉलो करताना दिसलेल्या या जोडीनं इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एकमेकांना अनफॉलो केल्याचे समोर येत आहे. त्यामुळेच दोघांचे ब्रेक झाल्याच्या चर्चेला उधाण आल्याचे दिसते. दोघांनी नात्याबद्दल कधीच उघडपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.  

हार्दिक-नताशा विभक्त झाले, पण... 

हार्दिक आणि नताशा या दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. विभक्त झाल्यावरही दोघे मिळून ती मुलगा अगस्त्याचा सांभाळ करतानाही पाहायला मिळते.

Web Title: Hardik Pandya And Jasmin Walia Spark Breakup Rumours After Unfollowing Each Other On Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.